IPL 2025 ऑक्शनपूर्वी Mumbai Indians चा मोठा निर्णय, ट्रॉफी जिंकून देणाऱ्या 'या' दिग्ग्जाची घरवापसी
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mahela Jayawardene In Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने श्रीलंकेचा माजी स्टार खेळाडू महेला जयवर्धने याची मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीची घोषणा केली आहे. जयवर्धने यापूर्वी 2017 ते 2022 या काळात मुंबई इंडियन्ससोबत होता.
Mumbai Indians in IPL 2025 : गेल्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीमध्ये टीमची कामगिरी निराशाजनक राहिली होती. तर मार्क ब्राऊचर यांच्या कार्यशैलीवर देखील अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. अशातच आता मुंबई इंडियन्स संघाने मोठा निर्णय घेतला असून महेला जयवर्धनेलाची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीची केली आहे. मुंबई इंडियन्सने याची अधिकृत घोषणा केली आहे.
मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून महेला जयवर्धनेला परत आल्यानं आम्हाला आनंद होतोय. त्याचे नेतृत्व, ज्ञान आणि खेळाबद्दलची आवड यांचा एमआयला नेहमीच फायदा झाला आहे. मार्क बाउचर यांचे गेल्या दोन मोसमातील योगदानाबद्दल आभार मानण्याची ही संधी मी घेऊ इच्छितो. त्यांच्या काळात त्यांचे कौशल्य आणि समर्पण महत्त्वपूर्ण होते, असंही आकाश अंबानी यांनी म्हटलं आहे.
advertisement
महिला जयवर्धने काय म्हणाला?
मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा आल्याने मला आनंद होतोय, मागे २०१७ मध्ये मी जेव्हा मुंबई इंडियन्समध्ये आलो, तेव्हा आमच्यासमोर आव्हान होतं की संघात नवे आणि युवा टॅलेन्ट असलेले खेळाडू आणायचे आणि आम्ही ते काम यशस्वीरित्या करून दाखवलं. २०१७ नंतर आता पुन्हा आमच्याकडे ती संधी आहे. पुन्हा इतिहास घडवायचा आहे. आणि मी हे आव्हान स्विकारण्यासाठी तयार आहे, असं महिला जयवर्धनेने म्हटलं आहे.
advertisement
. . #MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @MahelaJay pic.twitter.com/SajRfzLYkQ
— Mumbai Indians (@mipaltan) October 13, 2024
दरम्यान, मुंबई इंडियन्स यंदा कोणाला रिलीज करणार आणि कोणाला रिटेन करणार? याचा निर्णय देखील आता महिला जयवर्धनेला घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर रोहित शर्माला ठेवायचं की सोडायचं? यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार, हार्दिक, बुमराह आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवणार असले तरी इशान किशनच्या भवितव्याचा निर्णय महिला जयवर्धनेच्या हाती असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2024 4:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 ऑक्शनपूर्वी Mumbai Indians चा मोठा निर्णय, ट्रॉफी जिंकून देणाऱ्या 'या' दिग्ग्जाची घरवापसी