Team India Squad Announced: व्हाईस कॅप्टन बदलला, करुण नायर OUT, वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर!

Last Updated:

IND vs WI test series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर करण्यात आला आहे.

Team India squad Announced
Team India squad Announced
Team India squad Against West Indies : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या कसोटी (India vs West Indies) मालिकेसाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर करण्यात आला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळेल. स्कॉडमध्ये मोठा बदल केला गेला असून इंग्लंडविरुद्ध फेल ठरलेल्या करुण नायरला (Karun Nair) संधी दिली गेली नाही. तर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचं प्रमोशन झालं असून त्याला व्हाईस कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली आहे. कोणत्या 15 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पाहा

युवा खेळाडू आणि चार ऑलराऊंडर्स

टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांवर सलामीवीर म्हणून जबाबदारी असणार आहे. तर केएल राहुल हा अनुभवी खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल या तीन युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि़ नितीश कुमार रेड्डी या चार ऑलराऊंडर्सला संधी देण्यात आलीये.
advertisement

बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये कोण? 

बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर मुख्य प्रभाव असणार आहे. तसेच रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव स्पिनर्सचं डिपार्टमेंट सांभाळतील. आम्हाला करुण नायरकडून जास्त अपेक्षा होत्या. फक्त एक डाव खेळता येणार नाही. पडिक्कलला जास्त संधी मिळाल्या नाहीत. आम्हाला सर्वांना 15 ते 20 संधी द्यायची आहेत, पण या परिस्थितीत ते शक्य नाही, असं अजित आगरकरने म्हटलं आहे.
advertisement
वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडिया - शुभमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India Squad Announced: व्हाईस कॅप्टन बदलला, करुण नायर OUT, वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर!
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement