T20 वर्ल्ड कपसाठी उद्या टीम इंडियाची घोषणा, गिल खेळणार का नाही? आगरकर-गंभीर रिस्क घेणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी टीम इंडियाची निवड कधी केली जाणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रक काढून टीम निवडीची तारीख सांगितली आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी टीम इंडियाची निवड कधी केली जाणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रक काढून टीम निवडीची तारीख सांगितली आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान टी-20 र्ल्ड कप होणार आहे. हा टी-20 वर्ल्ड कप आणि त्याआधी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची निवड 20 डिसेंबर म्हणजेच उद्या होणार आहे. मुंबईमधल्या बीसीसीआयच्या मुख्यालयात टीमची निवड केली जाईल.
न्यूझीलंडविरुद्धची टी-20 सीरिज आणि त्यानंतर होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा शनिवारी दुपारी दीड वाजता होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 8 मॅच होणार आहेत, ज्यात पहिले 3 वनडे आणि मग 5 टी-20 मॅच खेळवल्या जातील. वनडे सीरिजचे सामने 11 जानेवारी, 14 जानेवारी आणि 18 जानेवारीला अनुक्रमे बडोदा, राजकोट आणि इंदूरमध्ये होतील.
advertisement
वनडे सीरिजनंतर 21 ते 31 जानेवारीदरम्यान 5 टी-20 सीरिज खेळवली जाईल. पहिली टी-20 मॅच नागपूरमध्ये, दुसरी मॅच 23 जानेवारीला रायपूरमध्ये, तिसरा सामना 25 जानेवारीला गुवाहाटीमध्ये होईल. तर चौथी मॅच विशाखापट्टणमला 28 जानेवारीला आणि शेवटची मॅच 31 जानेवारीला तिरुवनंतपुरमला होईल.
गिलचा फॉर्म चिंतेचा विषय
न्यूझीलंडविरुद्धची सीरिज आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम निवडीला 24 तास शिल्लक असतानाच शुभमन गिलचा फॉर्म आणि फिटनेस टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. मागच्या 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गिलला अर्धशतक करता आलेलं नाही. तसंच चौथ्या टी-20 आधी प्रॅक्टिस करताना गिलच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे तो सीरिजमधूनही बाहेर झाला आहे. शुभमन गिल वेळेत फिट झाला नाही तर त्याला टी-20 वर्ल्ड कपला मुकावं लागू शकतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 4:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपसाठी उद्या टीम इंडियाची घोषणा, गिल खेळणार का नाही? आगरकर-गंभीर रिस्क घेणार!










