Rahul Dravid : राजस्थान रॉयल्समध्ये पडले 3 गट! राहुल द्रविडच्या राजीनाम्याची Inside Story
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
2024 मध्ये टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससोबतचे संबंध तोडले आहेत.
मुंबई : 2024 मध्ये टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससोबतचे संबंध तोडले आहेत. द्रविडने टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. आयपीएल 2025 मध्ये राजस्थानने राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक बनवले होते. या मोसमात टीमची कामगिरी खूपच खराब होती आणि राजस्थान रॉयल्सला 14 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले. राहुल द्रविडने अचानक राजीनामा ता दिला? याचे मोठे कारण समोर आले आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, टीम इंडियाचा माजी कर्णधार टीममधील गटबाजीमुळे काहीसा नाराज होता.
द्रविडने राजीनामा का दिला?
जुलै महिन्यात आयपीएल 2025 मधील राजस्थान रॉयल्सच्या खराब कामगिरीबाबत लंडनमध्ये राजस्थान रॉयल्सचं व्यवस्थापन आणि राहुल द्रविड यांच्यात चर्चा झाली होती. राजस्थान रॉयल्स व्यवस्थापन द्रविडला टीममध्ये मोठे स्थान देऊ इच्छित होते, पण द्रविड त्यासाठी तयार नव्हता. याशिवाय, राहुल द्रविड टीममध्ये सुरू असलेल्या गटबाजीमुळेही नाराज होता. कदाचित म्हणूनच तो फक्त एका मोसमानंतर राजस्थान रॉयल्सपासून वेगळा झाला.
advertisement
आयपीएल 2025 दरम्यान ओपनिंगवरून संजू सॅमसन आणि राहुल द्रविड यांच्यात मतभेद झाल्याचे वृत्त होते. संजू सॅमसन स्वतः ओपनिंग करू इच्छित होता, तर राहुल द्रविड वैभव सूर्यवंशीला ओपनिंग बॅट्समन म्हणून टीममध्ये घेऊ इच्छित होता. या हंगामात राजस्थानची कामगिरी खूपच खराब राहिली आणि ते पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर राहिले. राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये तीन गट तयार झाले होते, जे वेगवेगळे कर्णधार नियुक्त करण्याबद्दल बोलत होते, असंही बोललं जात आहे.
advertisement
कोण होणार पुढचा प्रशिक्षक?
राहुल द्रविडच्या राजीनाम्यानंतर, राजस्थान रॉयल्सने प्रशिक्षक शोधण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचे नाव वरच्या क्रमांकावर येत आहे. संगकारा सध्या टीमचा संचालक आहेत. राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बडाले यांनी यासाठी लंडनमध्ये संपूर्ण सपोर्ट स्टाफची बैठक बोलावली आहे, जिथे मुख्य प्रशिक्षकाबाबत निर्णय घेतला जाईल. या बैठकीला संगकारा या बैठकीत उपस्थित राहणार की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
advertisement
टीम इंडियाचे माजी बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड या बैठकीला उपस्थित राहू शकतात. द्रविडसोबत विक्रम राठोड राजस्थान रॉयल्सशीही संबंधित होते. जर संगकारा टीमचा मुख्य प्रशिक्षक झाला तर ट्रेवर पेनी आरआरमध्ये मोठी भूमिका बजावू शकतात. दरम्यान, राहुल द्रविडच्या राजीनाम्यानंतर अनेक टीम त्याच्याशी संपर्क साधत असल्याचं सांगण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 31, 2025 11:02 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rahul Dravid : राजस्थान रॉयल्समध्ये पडले 3 गट! राहुल द्रविडच्या राजीनाम्याची Inside Story