IPL 2025 : इकडे RCB जिंकली, तिकडे विजय माल्या ट्रोल, नेमकं काय घडलं?

Last Updated:

बंगळुरूच्या विजयावर आता संघाचे माजी मालक विजय माल्ल्या यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर विजय माल्ल्या यांना खूप ट्रोल करण्यात आले आहे.

vijay mallay on rcb
vijay mallay on rcb
Vijay Mallya Reaction on RCB Win : आयपीएल 2025 च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चँलेंजर्स बंगळुरूने 6 विकेटस राखत लखनऊ सूपर जाएंट्सवर शानदार विजय मिळवला. या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आता टॉप 2 मध्ये पोहोचली आहे.आता त्यांचा सामना क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्जशी होणार आहे. पण या सामन्यापूर्वी बंगळुरूच्या विजयावर आता संघाचे माजी मालक विजय माल्ल्या यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर विजय माल्ल्या यांना खूप ट्रोल करण्यात आले आहे.
लखनऊचा पराभव करत पहिल्या क्वालिफायर सामन्यात पोहोचणाऱ्या बंगळुरू संघाचं आता विजय माल्ल्या यांनी अभिनंदन केले आहे. विजय माल्ल्या यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर लिहले की,लखनऊ संघावर जोरदार विजय मिळवल्याबद्दल आणि आयपीएलमध्ये विजयाचा विक्रम रचल्याबद्दल आरसीबीचे अभिनंदन'. विजय मल्ल्या पुढे लिहितात की, 'मला आशा आहे की मजबूत गती आणि संघातील प्रमुख खेळाडूंच्या पुनरागमनामुळे, आरसीबीचा संघ आयपीएल ट्रॉफी जिंकू शकेल'.
advertisement

सोशल मीडियावर ट्रोल

बंगळूरूचे अभिनंदन केल्यानंतर विजय माल्या सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. एका युझरने विजय माल्या यांच्या पोस्टवर कमेंट केले की,'फरार, भारताचे पैसे परत करा'. दुसऱ्या युझरने लिहिले, 'जर तुमच्यात हिंमत असेल तर फायनल पाहण्यासाठी भारतात या'. तिसऱ्या युझरने सोशल मीडियावर लिहिले, 'जर आरसीबीने यावेळी आयपीएल जिंकले तर बँकेचे कर्ज फेडून परत या... देश तुम्हाला माफ करेल, फक्त ट्रॉफीसोबत एक सेल्फी पोस्ट करा 'घर वापसी'!' दुसऱ्या वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर लिहिले, 'बाबाजी, एसबीआयचे पैसे द्या, आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणखी वाढेल'.
advertisement

किती तारखेला सामना होणार?

प्लेऑफच्या सामन्यांना गुरूवारी 28 मे पासून सूरूवात होत आहे. त्यामुळे क्वालिफायर 1 चा सामना हा पॉईटस टेबलमध्ये पहिल्या स्थानी असलेल्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे.हा सामना मुल्लानपूर स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : इकडे RCB जिंकली, तिकडे विजय माल्या ट्रोल, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement