Viral Video: वर्ल्डकप पराभवानंतर रोहित शर्माच्या मुलीचा गोंडस व्हिडीओ व्हायरल, म्हणाली-'ते एका महिन्यात पुन्हा...'

Last Updated:

यावर्षी संपूर्ण भारताला वर्ल्डकप आपणच जिंकणार अशी खात्री होती. परंतु अगदी अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. त्यामुळे क्रिकेटर्ससह सर्वांच्या मनावर आघात झाला. सर्वांना याचा त्रास झाला. भारताच्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अत्यंत निराश झाला. मैदानावरच त्याच्या डोळ्यात अश्रू दिसत होते.

News18
News18
मुंबई, 24 नोव्हेंबर : वर्ल्डकप 2023 च्या सर्व मॅचेस जिंकल्यानंतर भारतीय संघ शेवटची म्हणजचे फायनल मॅच हरला. यावर्षी संपूर्ण भारताला वर्ल्डकप आपणच जिंकणार अशी खात्री होती. परंतु अगदी अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. त्यामुळे क्रिकेटर्ससह सर्वांच्या मनावर आघात झाला. सर्वांना याचा त्रास झाला. भारताच्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अत्यंत निराश झाला. मैदानावरच त्याच्या डोळ्यात अश्रू दिसत होते.
पराभवानंतर टीम इंडियाच्या इतर अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट केले. परंतु, रोहित शर्माने वर्ल्ड कप 2023 पासून सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केलेली नाही. त्यामुळे त्याची मनस्थिती कशी आहे किंवा त्याचे काय चालले आहे. हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच आहे. अशातच रोहित श्रमाची आता त्यांची मुलगी समायरा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
या व्हिडिओमध्ये सामायरा तिची आई रितिका सजदेहसोबत दिसत आहे आणि ती रोहित शर्माबद्दल काहीतरी सांगत आहे. समायराला विचारण्यात आले की तू कशी आहेस? तर समायरा हात हलवताना दिसली. त्यानंतर तिला विचारले गेले की, रोहित कसा आहे? यावर ती म्हणते, "ते त्यांच्या रूममध्ये आहे, ते सकारात्मक आहे आणि महिन्याभरात ते पुन्हा असतील." समयाराचे हे उत्तर अतिशय गोड वाटते.
advertisement
मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, या व्हिडिओचा वर्ल्डकप 2023 च्या पराभवही काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ वर्ल्ड कप फायनलनंतरचा नसून जुना आहे. वास्तविक, जेव्हा रोहित शर्मा कोविड दरम्यान पॉझिटिव्ह आढळला होता. तेव्हाच हा व्हिडिओ आहे. यामध्ये सामायरा रोहितबद्दल हे सांगत होती. मात्र आता हा व्हिडीओ वर्ल्ड कप 2023 च्या फायनलशी लिंक करून शेअर केला जात आहे.
advertisement
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Viral Video: वर्ल्डकप पराभवानंतर रोहित शर्माच्या मुलीचा गोंडस व्हिडीओ व्हायरल, म्हणाली-'ते एका महिन्यात पुन्हा...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement