IND vs SA : विराट कॅच आऊट, पण चूक सुंदर, केएलची; नाही तर फिक्स होती डबल सेंच्यूरी

Last Updated:

झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सूरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 349 धावा ठोकल्या आहेत. विराट कोहलीच्या 135 धावांच्या शतकीय खेळीच्या बळावर भारताने हा डावांचा हा डोंगर उभारला होता.

News18
News18
India vs South Africa 1st odi : झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सूरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 349 धावा ठोकल्या आहेत. विराट कोहलीच्या 135 धावांच्या शतकीय खेळीच्या बळावर भारताने हा डावांचा हा डोंगर उभारला होता. खरं तर विराट कोहलीची आज डबल सेंच्यूरीही झाली असती आणि भारताचा डाव 400 पारही जाऊ शकला असता पण वॉशिग्टंन सुंदर आणि के एल राहुलच्या चुकीमुळे विराटची विकेट पडली आणि शेवटच्या क्षणी भारताचा डाव गडगडला.
खरं तर विराट कोहलीने आज 135 धावांची खेळी केली होती.या खेळीत त्याने 7 षटकार आणि 11 चौकार मारले आहेत. या सामन्यात विराट उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. ज्यावेळेस तो 99 वर खेळत होता त्यावेळेस त्याने एक चौकार मारून आपलं शतक मारलं होतं. या शतका दरम्यान वॉशिंग्टन सुंदर आणि के एल राहुल खूपच हळू धावा काढत होते.त्यामुळे भारताची धावगती खूपच कमी झाली होती.
advertisement
शेवटी भारताची धावगती वाढवण्यासाठी विराट कोहलीनेच पुढाकार घेतला आणि त्याने शतकानंतरच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये दोन षटकार आणि दोन चौकार मारले आहेत. त्यानंतर आणखी पुढच्या ओव्हरमध्ये त्याने आणखी दोन चौकार मारले होते. यानंतर त्याने एक धावाही काढली. अशाप्रकारे तो 132 धावांवर होता. खरं तर 99 पासून ते 131 धावापर्यंत विराट खूपच वेगाने खेळला. पण या वेगाने खेळल्यामुळे तो विराट कोहली आऊट होऊन बसला होता.
advertisement
दरम्यान विराट कोहली बाद झाल्यानंतर राहुलने भारताचा डाव सावरला. राहुलने 60 धावांची खेळी करून बाद झाला.त्यानंतर रविंद्र जडेजा 32 वर बाद झाला. अशाप्रकारे भारताने 8 विकेट गमावून 349 धावा ठोकल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : विराट कॅच आऊट, पण चूक सुंदर, केएलची; नाही तर फिक्स होती डबल सेंच्यूरी
Next Article
advertisement
Raj Thackeray : बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
  • महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणांची उलथापालथ सुरू आहे.

  • मनसे मुंबईत उद्धव यांची साथ सोडून थेट महायुतीला पाठिंबा देतील अशी चर्चा

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

View All
advertisement