IND vs AUS : टेस्टमधून निवृत्ती घेतल्यानंतर लंडनला का निघून गेला विराट? किंग कोहलीने स्वत: सांगितलं खरं कारण!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Virat Kohli On London Life : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना आज पर्थ स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, कोहलीने तो लंडनला का स्थलांतरित झाला? हे स्पष्ट केलं आहे
India vs Australia 1st ODI : भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू झाला आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. मिशेलचा प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय योग्य ठरला. पण विराट कोहलीने मॅचपूर्वी मोठं वक्तव्य केलं होतं.
मी फक्त माझं आयुष्य जगत होतो - विराट कोहली
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना आज पर्थ स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, कोहलीने तो लंडनला का स्थलांतरित झाला? हे स्पष्ट केलं आहे. "मला वाटतं मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊन बराच काळ लोटला आहे. मी फक्त माझं आयुष्य जगत होतो. तुम्हाला माहिती आहे, मी बरीच वर्षे फार काही करू शकलो नाही. माझ्या कुटुंबासोबत, माझ्या मुलांसोबत, माझ्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. हा एक सुंदर प्रवास होता जो मी खूप एन्जॉय केला आहे", असं विराट कोहली मॅचपूर्वी बोलताना म्हणाला.
advertisement
विराटला खातंही उघडता आलं नाही
भारताने चौथ्या ओव्हरमध्ये रोहित शर्माच्या रूपात मोठी विकेट गमावली. रोहितला फक्त 8 धावा करता आल्या. विराट कोहलीची कामगिरी रोहितपेक्षाही वाईट होती. कोहलीने 8 चेंडूंचा सामना केला पण त्याला खाते उघडता आलं नाही. स्ट्रेलियात पहिल्यांदाच विराट कोहली एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाला. स्टार्कने हुशारीने बाद केलं, कारण विराटला मागील ओव्हरमध्ये, म्हणजे पाचव्या ओव्हरमध्ये एकही धाव घेता आली नाही.
advertisement
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 1:39 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : टेस्टमधून निवृत्ती घेतल्यानंतर लंडनला का निघून गेला विराट? किंग कोहलीने स्वत: सांगितलं खरं कारण!