VIDEO : विजयी जल्लोषात कोहली 'ती' गोष्ट विसरला नाही,भर मैदानात जे केलं...145 कोटी भारतीयांचं मन जिकलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सिडनीच्या मैदानावर रंगलेला तिसरा वनडे सामना भारताने 9 विकेटस राखून जिंकला आहे. रोहित शर्माच्या नाबाद 120 धावा आणि विराट कोहलीच्या नाबाद 69 धावांच्या बळावर भारताने हा सामना जिंकला होता. या विजयानंतर भारताने मैदानात जल्लोष केला.
Virat Kohli Viral Video: सिडनीच्या मैदानावर रंगलेला तिसरा वनडे सामना भारताने 9 विकेटस राखून जिंकला आहे. रोहित शर्माच्या नाबाद 120 धावा आणि विराट कोहलीच्या नाबाद 69 धावांच्या बळावर भारताने हा सामना जिंकला होता. या विजयानंतर भारताने मैदानात जल्लोष केला. विशेष म्हणजे या जल्लोषात विराट कोहली ती गोष्ट विसरला नाही. भरगच्च मैदानात त्याने जे केलं ते पाहून त्याने 145 कोटी भारतीयांचं मन जिकलं आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.त्यामुळे विराट कोहलीने नेमकं मैदानात काय केलं आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर भारताने सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही खेळाडू ड्रेसिंग रूमच्या दिशेने निघाले होते.या दरम्यान दोघेही खेळाडू जात असताना सपोर्टींग स्टाफमधील काही व्यक्ती त्यांच्या खेळीचे कौतुक करत होते. या दरम्यान काही फॅन्स भारतीय झेंडा घेऊन आणि क्रिकेटची बॅट घेऊन विराट कोहली आणि रोहित शर्माच्या ऑटोग्राफची वाट पाहत होते. याच दरम्यान कोहली जात असताना एका फॅन्सच्या हातून भारताचा झेंडा जमिनीवर पडला. विराट कोहलीने ही गोष्ट पाहता लगेच तो झेंडा उचलून फॅन्सच्या हातात दिला.त्यामुळे भर मैदानात विराट कोहलीने केलेले हे कृत्य प्रचंड चर्चेत आलं आहे. विराटच्या याच कृत्याने त्याने 145 कोटी जनतेच मन जिंकलं आहे.
advertisement
— rea (@reaadubey) October 25, 2025
कसा रंगला सामना
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 236 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सूरूवात चांगली झाली होती. पण शुभमन गिलला मोठी खेळी करता आली नाही आणि तो अवघ्या 24 धावांवर बाद झाला.त्याच्यानंतर रोहित शर्माने नाबाद 120 धावा आणि विराट कोहलीच्या नाबाद 69 धावांच्या बळावर भारताला हा सामना 9 विकेटसने जिंकून दिला. भारताने 38.3 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठलं होतं.
advertisement
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली होती. पण पुढे जाऊन भारतीय गोलंदाजांनी त्यांनी एकामागून एक धक्के द्यायला सूरूवात केली होती.त्यामुळे ऑस्ट्रेलिया 236 धावांवर ऑल आऊट झाली होती. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा या रेन्शॉने 56 केल्या होत्या.त्या व्यतिरीक्त इतर खेळाडूंची बॅट चालली नव्हती. टीम इंडियाकडून हर्षित राणाने 4,वॉशिग्टंन सुंदरने 2 तर सिराज, प्रसिद्ध, कुलदीप आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली होती.
advertisement
भारताने हा विजय मिळवून व्हाईटवॉश टाळला आहे.तर ऑस्ट्रेलियाने 2-1 ने ही मालिका जिंकली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
advertisement
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 6:07 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : विजयी जल्लोषात कोहली 'ती' गोष्ट विसरला नाही,भर मैदानात जे केलं...145 कोटी भारतीयांचं मन जिकलं


