Asia Cup Trophy : पाकिस्तानने आशिया कपची ट्रॉफी चोरून कुठं ठेवली? लोकेशन सापडलं! दुबईतून आली मोठी अपडेट
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Where is Asia Cup 2025 Trophy : पाकिस्तानचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आशिया कपची ट्रॉफी उचलून घेऊन गेल्याचं काल पहायला मिळालं होतं. अशातच आता ट्रॉफी कुठं आहे? याची माहिती मिळालीये.
Asia Cup 2025 Trophy : आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे संतप्त होऊन नक्वी ट्रॉफी घेऊन हॉटेलमधून निघून गेले. बीसीसीआय या वर्तनामुळे नाराज आहे आणि आयसीसीकडे तक्रार करण्याची योजना आखत आहे. अशातच आता आशिया कपची ट्रॉफी नेमकी कुठं आहे? याचा पत्ता लागला आहे.
नक्वीच्या हॉटेलच्या खोलीत आशिया कपची ट्रॉफी?
भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव देवजित सैकिया यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर भारताला आशिया कप ट्रॉफीसह आनंद साजरा करू न दिल्याबद्दल टीका केली आहे. रविवारी दुबईमध्ये भारताच्या 5 विकेटने विजयानंतर एएनआयशी बोलताना सैकिया म्हणाले की, नक्वी यांनी आशिया कप त्यांच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाणं हे खेळाच्या भावनेविरुद्ध आहे. त्यामुळे नक्वीच्या हॉटेलच्या खोलीत आशिया कपची ट्रॉफी होती का? असा प्रश्न विचारला जात आहे.
advertisement
ट्रॉफी दुबईतील आयसीसीच्या मुख्यालयात...
पाकिस्तानच्या अध्यक्षांनी पळवलेली आशिया कपची ट्रॉफी ही सध्या दुबईतील आयसीसीच्या मुख्यालयात असल्याची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलचं हेड क्वार्टर हे दुबई क्रिकेट स्टेडियमच्या बाजूलाच आहे. चार पावलांवर असलेल्या या मुख्यालयात ट्रॉफी ठेवण्यात आली आहे.
ट्रॉफीबाबत आयसीसीचा नियम काय आहे?
कर्णधाराने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणं हे आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत येऊ शकते, परंतु याबाबत कोणतेही विशिष्ट नियम नाहीत. ते क्रिकेटच्या भावनेविरुद्ध असू शकते. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला त्याने ट्रॉफी का स्वीकारली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि त्यानंतर एसीसी किंवा आयसीसी कोणत्याही कारवाईचा निर्णय घेईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 2:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup Trophy : पाकिस्तानने आशिया कपची ट्रॉफी चोरून कुठं ठेवली? लोकेशन सापडलं! दुबईतून आली मोठी अपडेट