Shikhar Dhawan Retirement: 'मी आज अशा टप्प्यावर उभाय जिथून....' धवनचा तो भावनिक VIDEO अन् 13 वर्षांच्या करियरला 'अलविदा'

Last Updated:

Shikhar Dhawan Retirement : ''मी आज अशा एका टप्प्यावर उभा आहे जिथे मागे वळून पाहिल्यावर मला फक्त आठवणीच दिसतात.''

शिखर धवनचा इमोशन व्हिडीओ
शिखर धवनचा इमोशन व्हिडीओ
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिखर धवननला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याने एक व्हिडीओ शेअर करुन आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा गब्बर म्हणून ओळखला जाणाऱ्या शिखर धवननं धक्कादायक निर्णय घेतला आहे. शिखर धवननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. 13 वर्षांहून अधिक काळ क्रिकेट खेळल्यानंतर त्याने आपल्या करियरला अलिवदा म्हणताना भावूक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
''नमस्कार! सगळ्यांना, मी आज अशा एका टप्प्यावर उभा आहे जिथे मागे वळून पाहिल्यावर मला फक्त आठवणीच दिसतात. पुढे पाहिल्यावर संपूर्ण जग दिसतं. माझी कायम एकच इच्छा होती भारतासाठी खेळणं. ती इच्छा पूर्णही झाली, त्यासाठी मी अनेकांचे मनापासून आभार मानतो. माझ्या कुटुंबाचे, प्रशिक्षकांचे, बीसीसीआयचे मी आभार मानतो.
''माझी टीम ज्या टीमचा अनेक वर्ष मी एक भाग होतो आणि टीम इंडियाकडून खेळत होतो. मला एक कुटुंब मिळालं, नाव मिळालं आणि तुमच्या सगळ्यांचं भरभरुन प्रेम मिळालं. म्हणतात ना पुढे जाण्यासाठी पानं उलटणं गरजेचं असतं, तसंच मी आज माझ्या आयुष्यातल्या एका टप्प्यावरील प्रवास थांबवत आहे. आंतराष्ट्रीय आणि घरच्या मैदानावर होणाऱ्या क्रिकेटमधून मी निवृत्ती जाहीर करत आहे. ''
advertisement
''मी माझ्या क्रिकेट जर्निसाठी जेव्हा अलविदा म्हणत आहे तेव्हा माझं अंतकरण जड होण्याऐवजी मला एक वेगळंच समाधान, मी माझ्या देशासाठी खूप खेळू शकलो याचं सुख आहे. मी बीसीसीआयचा खूप आभारी आहे त्यांनी मला ही संधी दिली. मला भरभरुन प्रेम देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या शुभेच्छा कायम माझ्यासोबत राहूदे.''
advertisement
''मी स्वत:ला इतकंच सांगतो की तू यापुढे टीम इंडियाकडून पुन्हा भारतासाठी खेळणार नाही याचं दु:ख करत बसू नकोस, तुला भारतासाठी भरपूर खेळण्याची संधी मिळाली याचा गर्व आणि समाधान मनात ठेव. मी भारतासाठी खेळलो ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. ''
शिखर धवन करियर
धवनने भारतासाठी 167 वनडे सामने, 68 टी-20 आणि 34 कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 7 शतकांसह 2315 धावा आहेत तर वनडे सामन्यात त्याने 17 शतकांच्या मदतीने 6782 धावा केल्याची नोंद आहे. T20 मध्ये धवनने 11 अर्धशतकांसह 1759 धावा केल्या आहेत. धवनने 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shikhar Dhawan Retirement: 'मी आज अशा टप्प्यावर उभाय जिथून....' धवनचा तो भावनिक VIDEO अन् 13 वर्षांच्या करियरला 'अलविदा'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement