Rohit Sharma : मुलीचा जीव वाचवण्यासाठी रोहितचा हात पकडला, सिक्युरिटी तोडली, डोळ्यात पाणी आणणारी आईची करुण कहाणी
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडे मॅचवेळी एक महिला टीम हॉटेलमध्ये शिरली आणि तिने रोहित शर्माचा हात पकडला.
इंदूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडे मॅचवेळी एक महिला टीम हॉटेलमध्ये शिरली आणि तिने रोहित शर्माचा हात पकडला. रोहित शर्मा हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना ही घटना घडली आहे. महिला सुरक्षेचं कवच तोडून रोहित शर्माला भेटायला पोहोचली आणि मदत करण्यासाठी विनवणी करू लागली. माझ्या मुलीला गंभीर आजार झाला आहे, त्यासाठी 9 कोटी रुपयांच्या इंजेक्शनची गरज आहे, असं महिला म्हणाली आहे.
सरिता शर्मा असं या महिलेचं नाव आहे. मुलगी अनिका हिला गंभीर आजार झाला आहे, या आजारासाठी अमेरिकेहून इंजक्शन मागवावं लागणार आहे, ज्याची किंमत 9 कोटी रुपये आहे. आतापर्यंत मी थोडे थोडे करून 4.1 कोटी रुपये जमा केले आहेत, पण वेळ निघून चालली आहे. मला क्रिकेटपटूंकडून मदतीची अपेक्षा आहे. विराट आणि रोहित मला मदत करतील, अशी अपेक्षा आहे, असं ही महिला म्हणाली आहे.
advertisement
मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी रोहित शर्मा ज्या हॉटेलमध्ये होता, त्या हॉटेलमध्ये गेले. भावनेच्या भरात मी रोहित शर्माचा हात पकडला. मॅचवेळी मी डोनेशन कॅम्पही लावला होता, पण तो पुरेसा नव्हता, अशी प्रतिक्रिया महिलेनी दिली.
A woman suddenly dodged the security and ran towards Rohit Sharma, grabbed his hand, and started shouting "help, help" at team hotel in Indore during indvnz match two days ago.
A few days ago, a similar woman had also gone to Elvish Yadav with her child. She was asking for help,… pic.twitter.com/AUXkqaC8jp
— (@rushiii_12) January 20, 2026
advertisement
महिलेने माफी मागितली
महिलेने तिच्या या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. विराट आणि रोहितने माझी स्थिती समजून घ्यावी. मी त्याच्या जवळ सेल्फी घ्यायला गेले नव्हते, तर मुलीचा जीव वाचवण्यासाठी गेले होते. मी अधिकाऱ्यांचीही माफी मागते. काय करायचं ते मला समजत नव्हतं, असं वक्तव्य महिलेने केलं आहे.
सिक्युरिटीला चकवा दिला
advertisement
हॉटेलमध्ये झालेल्या या गोंधळाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये महिला सिक्युरिटीला चकवा देऊन रोहित शर्माचा हात पकडत असल्याचं दिसत आहे. याआधी हीच महिला युट्युबर एलविश यादव याच्याकडेही मदत मागण्यासाठी गेली होती.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
Jan 21, 2026 4:47 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : मुलीचा जीव वाचवण्यासाठी रोहितचा हात पकडला, सिक्युरिटी तोडली, डोळ्यात पाणी आणणारी आईची करुण कहाणी









