advertisement

World Cup : ना विराट ना बुमराह, पाकिस्तानच्या उपकर्णधाराने सांगितले भारताचे दोन धोकादायक खेळाडू

Last Updated:

भारतामध्ये 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे, त्याआधी प्रत्येक टीम सराव सामने खेळत आहेत. सराव सामन्यांमधून टीम त्यांच्यातल्या कमजोरी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

News18
News18
मुंबई, 1 ऑक्टोबर : भारतामध्ये 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे, त्याआधी प्रत्येक टीम सराव सामने खेळत आहेत. सराव सामन्यांमधून टीम त्यांच्यातल्या कमजोरी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानचा न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात मोठा स्कोअर करूनही पराभव झाला. भारताविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्याआधी पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खान याने भारताचे दोन धोकादायक खेळाडू सांगितले आहेत.
'बॅटर म्हणून मला रोहित शर्मा जास्त आवडतो. तो एकदा सेट झाला तर त्याच्याविरुद्ध बॉलिंग करणं कठीण होतं. बॅटिंग करताना तो नंतर जास्तच धोकादायक होतो. बॉलिंगमध्ये मला कुलदीप यादव आवडतो, कारण मीही लेग स्पिनर आहे. अशा परिस्थितीमध्ये सपाट विकेटवर बॉलिंग करणं खूपच कठीण आहे,' असं शादाब खान म्हणाला आहे.
5 ऑक्टोबरला भारतामध्ये वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना 16 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणार आहे. जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा महामुकाबला रंगेल. आशिया कपच्या सुपर-4 स्टेजमध्ये भारताने 356 रन केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा 128 रनवर ऑलआऊट झाला होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup : ना विराट ना बुमराह, पाकिस्तानच्या उपकर्णधाराने सांगितले भारताचे दोन धोकादायक खेळाडू
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement