WPL 2026 : मुंबई इंडियन्सना डबल धक्का, लागोपाठ 2 पराभवानंतर गणित बिघडलं, प्ले-ऑफच्या रेसमध्ये ट्विस्ट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
डब्ल्यूपीएलमध्ये यूपी वॉरियर्सने लागोपाठ दुसऱ्यांदा मुंबईला पराभवाचा धक्का दिला आहे, त्यामुळे पॉईंट्स टेबलच्या रेसमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.
नवी मुंबई : डब्ल्यूपीएलमध्ये यूपी वॉरियर्सने लागोपाठ दुसऱ्यांदा मुंबईला पराभवाचा धक्का दिला आहे. यूपी वॉरियर्सने दिलेल्या 188 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 165 रनच करता आल्या, त्यामुळे त्यांचा 22 रननी पराभव झाला आहे. मुंबईकडून अमेलिया केरने 28 बॉलमध्ये नाबाद 49 रन केल्या, तर अमनजोत कौरने 24 बॉलमध्ये 41 रनची खेळी केली, पण या दोघींशिवाय इतर कोणालाही मोठा स्कोअर करण्यात यश आलं नाही. यूपीकडून शिखा पांडेला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, याशिवाय क्रांती गौड, सोफी एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा आणि च्लोइ ट्रायन यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर यूपी वॉरियर्सने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 187 रन केले. मेग लेनिंगने 45 बॉलमध्ये 70 रनची आक्रमक खेळी केली. तर लिचफिल्डने 37 बॉलमध्ये 61, हरलीन देओलने 25 आणि च्लोइ ट्रायनने 21 रन केले. मुंबईकडून नॅट स्कीव्हर ब्रंटला 2, अमेलिया केरला 3 विकेट मिळाल्या. तर निकोला कॅरे, हेली मॅथ्यूज आणि अमनजोत कौरला एक-एक विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
पॉईंट्स टेबलची स्थिती
मुंबई इंडियन्सचा यंदाच्या मोसमातला यूपी वॉरियर्सविरुद्धचा हा सलग दुसरा पराभव आहे. तसंच या मोसमात मुंबईने 5 सामन्यांमध्ये फक्त 2 विजय मिळवले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई 4 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर गुजरात जाएंट्स आणि यूपी वॉरियर्सही प्रत्येकी 4-4 पॉईंट्ससह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली कॅपिटल्सने एकच सामना जिंकल्यामुळे ते शेवटच्या म्हणजेच पाचव्या क्रमांकावर आहेत. मुंबई आणि यूपीने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, तर गुजरातने 4 आणि दिल्लीने 3 सामने खेळले आहेत. 3 सामन्यांमध्ये 3 विजय मिळवलेली आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये 6 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.
advertisement
मुंबई इंडियन्सच्या मोसमातल्या आणखी 3 मॅच शिल्लक आहेत, त्यामुळे प्ले-ऑफला पोहोचण्यासाठी मुंबईला उरलेल्या 3 सामन्यांपैकी कमीत कमी 2 सामने तरी जिंकावे लागणार आहेत. मुंबईचा नेट रनरेट हा इतर टीमपेक्षा चांगला असल्यामुळे मुंबईला कमीत कमी 2 विजय गरजेचे आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 7:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WPL 2026 : मुंबई इंडियन्सना डबल धक्का, लागोपाठ 2 पराभवानंतर गणित बिघडलं, प्ले-ऑफच्या रेसमध्ये ट्विस्ट!








