Mumbai Indians ने जाहीर केली रिटेन्शन लिस्ट, पाच खेळाडूंवर खर्च केले 9.25 कोटी, पण कॅप्टनला धक्का!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
WPL 2026 Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने अमेलिया केर, पूजा वस्त्राकर आणि यास्तिका भाटिया यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंना मात्र रिलीज केले आहे.
Mumbai Indians Retention List : टीम इंडियाने वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या पोरींनी जबरदस्त कामगिरी केली. अशातच आता टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने मोठं गिफ्ट दिलं आहे. मुंबईने आपली कॅप्टन हरमनप्रीतला आगामी लीगसाठी रिटेन केलं आहे. वुमेन्स प्रीमियर लीग 2026 च्या मेगा ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला आहे. 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. काही आठवड्यांपूर्वी, सर्व संघांनी त्यांच्या रिटेन्शन लिस्ट जाहीर केल्या आहेत. पाचही फ्रेंचायझींनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.
मुंबई इंडियन्सने रिटेन केले पाच खेळाडू
वुमेन्स प्रीमियर लीग 2026 च्या मेगा ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या पाच महत्त्वाच्या खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिच्यावर फ्रँचायझीने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. हरमनप्रीतसह नॅट सायव्हर-ब्रंट, हेली मॅथ्यूज आणि युवा भारतीय ऑलराऊंडर अमनजोत कौर तसेच जी. कमलिनी हिचाही रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे.
advertisement
9.25 कोटी रुपये खर्च केले
फक्त मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या पाचही रिटेन्शन खेळाडूंचा वापर केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चार, गुजरात जायंट्सने दोन आणि यूपी वॉरियर्सने फक्त एक खेळाडू कायम ठेवला आहे. मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौर, नॅट सायव्हर ब्रंट, हेली मॅथ्यूज, अमनजोत कौर आणि जी कमलिनी यांना कायम ठेवले, ज्यांच्यावर त्यांनी 9.25 कोटी रुपये खर्च केले. मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरला पहिल्या क्रमांकाचं रिटेन्शन दिलं नसून दुसऱ्या क्रमांकाचं रिटेन्शन दिलंय.
advertisement
EXCLUSIVE!
Paltan, start your Friday morning with THE moments which saw us retain our stars! #AaliRe #MumbaiIndians #TATAWPL pic.twitter.com/Hgaooc0GKV
— Mumbai Indians (@mipaltan) November 7, 2025
मुंबईचे बडे रिलीज खेळाडू कोण?
advertisement
दरम्यान, मुंबई इंडियन्सने अमेलिया केर, पूजा वस्त्राकर आणि यास्तिका भाटिया यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंना मात्र रिलीज केले आहे. दिल्ली कॅपिटल्सनेही जास्तीत जास्त पाच खेळाडूंना रिटेन केले आहे, तर आरसीबीने चार आणि गुजरात जायंट्सने दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. यूपी वॉरियर्सने सर्वात मोठा आणि आश्चर्यकारक निर्णय घेत केवळ एकाच खेळाडूला रिटेन केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 07, 2025 11:38 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians ने जाहीर केली रिटेन्शन लिस्ट, पाच खेळाडूंवर खर्च केले 9.25 कोटी, पण कॅप्टनला धक्का!


