OMG! Seriously? RCB च्या गौतमीची कामगिरी पाहून हार्दिकही झाला फिदा! कोण आहे गौतमी नाईक? थेट Video पाठवला
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Hardik Pandya Share Video For Gautami Naik : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या (RCB) गौतमी नाईक हिने मैदानात आपल्या बॅटने धडाकेबाज कामगिरी केली आणि त्यानंतर तिला तिच्या आवडत्या खेळाडूचा म्हणजेच हार्दिक पांड्याचा एक सरप्राईज व्हिडिओ मेसेज मिळाला.
WPL 2026 Hardik Pandya On Gautami Naik : वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये आरसीबीने सलग पाचव्या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात एका खेळाडूने सर्वांची मनं जिंकली. ही खेळाडू दुसरी तिसरी कुणी नसून ऑलराऊंडर गौतमी नाईक आहे. मैदानावरील कामगिरीनंतर गौतमीची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या शांत स्वभावाचे आणि खेळातील एकाग्रतेचे रहस्य उलगडले. "माझा आयडॉल हार्दिक पांड्या सर आहेत," असे सांगताना तिने पांड्याच्या खेळातील हायलाईट्सपेक्षा त्याच्या दबावाच्या परिस्थितीत शांत राहण्याच्या कौशल्याचे विशेष कौतुक केले. कठीण प्रसंगात पांड्या ज्या संयमाने मॅच जिंकून देतात, तेच आपले प्रेरणास्थान असल्याचे तिने नमूद केले.
चेहऱ्यावर एक निरागस हास्य
मुलाखत सुरू असतानाच गौतमीला सांगण्यात आले की, खुद्द हार्दिक पांड्याने तिच्यासाठी एक खास मेसेज पाठवला आहे. हे ऐकून तिला आपला कानवर विश्वासच बसला नाही. "सिरियसली?" असा प्रश्न विचारत तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य उमटले. आपल्या लाडक्या खेळाडूने आपल्या खेळाची दखल घेतली, हे पाहून गौतमी प्रचंड भारावून गेली होती.
advertisement
पहिल्या अर्धशतकाबद्दल अभिनंदन
हार्दिकने आपल्या मेसेजमध्ये गौतमीचे तिच्या पहिल्या अर्धशतकाबद्दल अभिनंदन केले. "हाय गौतमी, मला समजले की मी तुझा आदर्श आहे, हे ऐकून खूप छान वाटले. तुझ्या पहिल्या अर्धशतकाबद्दल तुझे खूप अभिनंदन," असे हार्दिक म्हणाला. त्याने तिला खेळाचा आनंद घेण्याचा आणि शिस्त पाळून देश व फ्रँचायझीसाठी मोठी कामगिरी करण्याचा मोलाचा सल्लाही दिला.
advertisement
पाहा Video
A moment Gautami Naik will never forget
She wasn't ready for this surprise from her cricketing idol
A moment to remember forever. #TATAWPL | #KhelEmotionKa | #GGvRCB | @hardikpandya7 | @RCBTweets pic.twitter.com/Th9z5nmzqY
— Women's Premier League (WPL) (@wplt20) January 20, 2026
advertisement
दरम्यान, डब्ल्यूपीएल सारख्या व्यासपीठामुळे स्थानिक खेळाडूंचे कौशल्य जगासमोर येत आहे. गौतमी नाईकसारख्या तरुण खेळाडूला मिळालेली ही पावती तिच्या आगामी कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सराव करता आणि तोच खेळाडू तुमच्या खेळाचे कौतुक करतो, तेव्हा त्या खेळाडूचा आत्मविश्वास द्विगुणित होतो, हेच गौतमीच्या चेहऱ्यावरील हास्याने सिद्ध केले.
Location :
Bangalore Rural,Karnataka
First Published :
Jan 20, 2026 12:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
OMG! Seriously? RCB च्या गौतमीची कामगिरी पाहून हार्दिकही झाला फिदा! कोण आहे गौतमी नाईक? थेट Video पाठवला








