Yashasvi Jaiswal : 'दो भाई, दोनो तबाही...', यशस्वीचं शतक तर तेजस्वीनेही धुतलं, अख्खा दिवस भावांनी गाजवला!

Last Updated:

यशस्वी जयस्वाल आणि तेजस्वी जयस्वाल या दोन्ही भावांनी 6 डिसेंबर 2025 चा दिवस गाजवला आहे. या दोघांनी एकाच दिवशी असा कारनामा केला आहे जो याआधी कधीच झाला नव्हता.

'दो भाई, दोनो तबाही...', यशस्वीचं शतक तर तेजस्वीनेही धुतलं, अख्खा दिवस भावांनी गाजवला!
'दो भाई, दोनो तबाही...', यशस्वीचं शतक तर तेजस्वीनेही धुतलं, अख्खा दिवस भावांनी गाजवला!
विशाखापट्टणम : यशस्वी जयस्वाल आणि तेजस्वी जयस्वाल या दोन्ही भावांनी 6 डिसेंबर 2025 चा दिवस गाजवला आहे. या दोघांनी एकाच दिवशी असा कारनामा केला आहे जो याआधी कधीच झाला नव्हता. यशस्वी जयस्वालने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये नाबाद अर्धशतक करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला, तर तेजस्वी जयस्वालने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्रिपुराकडून खेळताना अर्धशतक ठोकलं.
यशस्वी जयस्वालने 121 बॉलमध्ये नाबाद 116 रनची खेळी केली, ज्यात 2 सिक्स आणि 12 फोरचा समावेश होता. तेजस्वी जयस्वालने त्याच्या टी-20 करिअरमधलं पहिलं अर्धशतक ठोकलं, तर त्याचा लहान भाऊ यशस्वी जयस्वालने विशाखापट्टणममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात आंतरराष्ट्रीय शतक केलं.
त्रिपुराकडून खेळताना तेजस्वी जयस्वालने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तराखंडविरुद्ध 138 च्या स्ट्राईक रेटने 37 बॉलमध्ये 51 रन केले, त्याच्या या इनिंगमध्ये 1 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. दुसरीकडे यशस्वी जयस्वालने त्याच्या वनडे क्रिकेटमधलं पहिलंच शतक झळकावलं. यशस्वीच्या शतकाने टीम इंडियाचा विजय झाला असला तरी तेजस्वी जयस्वालने अर्धशतक करूनही त्रिपुराला विजय मिळवता आला नाही. या सामन्यात उत्तराखंडने त्रिपुराचा 4 विकेटने पराभव केला.
advertisement

जयस्वाल विराट-रोहितच्या क्लबमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा जयस्वाल हा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. यशस्वीआधी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या नावावर हा विक्रम होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 9 विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 270 रनचं आव्हान टीम इंडियाने फक्त 1 विकेट गमावून 39.5 ओव्हरमध्येच पार केलं. जयस्वालच्या शतकाशिवाय रोहित शर्माने 75 आणि विराट कोहलीने नाबाद 65 रन केले. सीरिजच्या पहिल्या दोन्ही सामन्यात शतकं आणि शेवटच्या सामन्यात अर्धशतक केलेल्या विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. तर रोहित शर्माने या सीरिजमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतकं केली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Yashasvi Jaiswal : 'दो भाई, दोनो तबाही...', यशस्वीचं शतक तर तेजस्वीनेही धुतलं, अख्खा दिवस भावांनी गाजवला!
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement