Shreyas Iyer वर 302 चा गुन्हा? वर्ल्ड कप स्टारच्या वडिलांचा खळबळजनक आरोप, म्हणाले 'चुकीला माफी नाही...'

Last Updated:

Yograj Singh Angry On Shreyas Iyer : पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यर याला अखेरच्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. श्रेयस अय्यर फक्त एक रन करू आऊट झाला. त्यामुळे आता त्याच्यावर काहींनी टीका केली आहे.

Yograj Singh Angry On Shreyas Iyer
Yograj Singh Angry On Shreyas Iyer
Yograj Singh lashed out Shreyas Iyer : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा (PBKS) कर्णधार श्रेयस अय्यरने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) विरुद्ध खेळलेल्या 'आळशी' शॉटवरून भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अय्यर अंतिम सामन्यात फक्त 1 रन (2 बॉलमध्ये) करून बाद झाला, त्याने रोमारियो शेफर्डच्या बॉलवर विकेटकीपर जितेश शर्माकडे कॅच दिला. यावरून माजी खेळाडू आणि वर्ल्ड कप स्टार युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी श्रेयसवर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले योगराज सिंग?

अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी पंजाब किंग्जच्या कर्णधाराने आपली विकेट गमावली, ज्यामुळे आरसीबीला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आणि पंजाब संघ दबावाखाली आला. श्रेयस अय्यरच्या या शॉटमुळे योगराज सिंग विशेषतः निराश झाले, त्यांनी या शॉटला 'गुन्हेगारी कृत्य' (criminal offence) असं संबोधलं आणि यासाठी कोणतीही माफी नसावी असं म्हटलं आहे.
advertisement

कोणतीही माफी नाही - योगराज सिंग

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग म्हणाले, "फायनलमध्ये श्रेयस अय्यरने जो शॉट खेळला, तो माझ्या मते एक गुन्हेगारी कृत्य आहे. अशोक मांकड यांनी मला या गुन्हेगारी कृत्याबद्दल सांगितलं होतं, जे कलम ३०२ (Section 302) अंतर्गत येते. त्यांनी मला असंही सांगितले की याचे परिणाम असे होतील की तुम्हाला दोन मॅचसाठी बॅन केले जाईल". श्रेयसने काल जे केले ते स्वीकारार्ह नाही. यासाठी कोणतीही माफी नाही, असं योगराज सिंग यांनी म्हटलं आहे.
advertisement
विशेष म्हणजे, याच मैदानावर मुंबई इंडियन्स (MI) विरुद्धच्या क्वालिफायर-२ सामन्यात अय्यरने ८७ नॉट आऊट (४१) धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात त्याची विकेट पंजाबला मॅच जिंकण्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसली.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer वर 302 चा गुन्हा? वर्ल्ड कप स्टारच्या वडिलांचा खळबळजनक आरोप, म्हणाले 'चुकीला माफी नाही...'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement