"रोहितच्या मागं 4 माणसं लावा, दररोज सकाळी 10 किलोमीटर पळवा", Yograj Singh यांच्याकडून हिटमॅनची पाठराखण!

Last Updated:

Yograj Singh On Rohit Sharma :  आम्हाला तुझी अजून 5 वर्षे गरज आहे. त्यामुळे देशासाठी अधिक खेळा, फिटनेसवर काम कर. त्याच्या मागे 4 माणसे लावा आणि त्याला रोज 10 किलोमीटर धावायला लावा, असं योगराज सिंग म्हणाले.

Yograj Singh praised Rohit Sharma
Yograj Singh praised Rohit Sharma
Yograj Singh praised Rohit Sharma : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने क्रिकेटच्या दोन फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आता रोहित शर्मा फक्त एकदिवसीय सामन्यामध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे. अशातच आता आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित शर्मा निवृत्त होईल, अशी चर्चा आहे. अशातच आता रोहितच्या निवृत्तीवर भारताचे माजी खेळाडू आणि वर्ल्ड कप स्टार युवराज सिंगचे वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी रोहित शर्माला काही महत्त्वाचे सल्ले देखील दिले आहेत.

योगराज सिंग काय म्हणाले?

ज्या माणसाविषयी अनेक लोक चुकीचे बोलतात तो म्हणजे रोहित शर्मा... मी त्याच दिवशी म्हटलं होतं की, रोहित माझा खेळाडू आहे. ज्या प्रकारे त्याने फलंदाजी केली, ती एका बाजूला आणि बाकी संघाची फलंदाजी दुसऱ्या बाजूला... त्याची एक इनिंग आणि बाकी जगाच्या इनिंग्ज एका बाजूला... हा त्याचा क्लास आहे, असं म्हणत योगराज सिंग यांनी News18 CricketNext शी बोलताना रोहितचं कौतुक केलं.
advertisement

"रोहितमध्ये 45 व्या वर्षापर्यंत खेळण्याची क्षमता"

तुम्ही रोहितला म्हणा की, आम्हाला तुझी अजून 5 वर्षे गरज आहे. त्यामुळे देशासाठी अधिक खेळा, फिटनेसवर काम कर. त्याच्या मागे 4 माणसे लावा आणि त्याला रोज 10 किलोमीटर धावायला लावा. जर त्याची इच्छा असेल तर त्याच्यात 45 व्या वर्षापर्यंत खेळण्याची क्षमता आहे, असंही योगराज सिंग यांनी म्हटलं आहे.
advertisement

तुम्हाला लाज वाटत नाही का? - योगराज सिंग

रोहित शर्माने डोमेस्टिक क्रिकेट खेळलं पाहिजे. त्यामुळे तो आणखी फिट होईल. फायनलमध्ये ‘सामनावीर’ (Man of the Match) कोण ठरला? रोहित शर्मा... त्यामुळे तुम्ही त्याच गोष्टींविषयी बोला, ज्या तुम्हाला माहिती आहेत. जर तुम्हाला त्याच्या खेळाबद्दल आणि फिटनेसविषयी बोलायचे असेल, तर तुम्ही कोणत्यातरी पातळीवर क्रिकेट खेळलेले असावे. अशा प्रकारे बोलताना तुम्हाला लाज वाटत नाही का? असा खडा सवाल देखील योगराज सिंग यांनी विचारला आहे.
advertisement

2027 चा वर्ल्ड कप खेळणार? 

दरम्यान, रोहितची पुढील आंतरराष्ट्रीय मॅच नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांची असेल. बीसीसीआय रोहितची संघातील भूमिका आणि 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup) तो संघाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य आहे की नाही, हे ठरवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरू शकतो.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
"रोहितच्या मागं 4 माणसं लावा, दररोज सकाळी 10 किलोमीटर पळवा", Yograj Singh यांच्याकडून हिटमॅनची पाठराखण!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement