Yograj Singh : 'मी मरायला तयार... कुटुंबाने साथ सोडली', जेवणासाठीही दुसऱ्यावर अवलंबून, युवराजच्या वडिलांचा बांध फुटला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारतीय क्रिकेट टीमचा माजी खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि तापट स्वभावासाठी ओळखले जातात. पण, योगराज सिंग यांनी अलिकडेच एका मुलाखतीमध्ये भावनिक प्रतिक्रिया दिली.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा माजी खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि तापट स्वभावासाठी ओळखले जातात. पण, योगराज सिंग यांनी अलिकडेच एका मुलाखतीमध्ये भावनिक प्रतिक्रिया दिली. मी मरायला तयार आहे, माझ्या आयुष्यात आता काहीही शिल्लक नाही, असं योगराज सिंग म्हणाले आहेत. कुटुंबापासून दूर असताना आपण एकाकीपणाशी कसे झुंज देत आहोत, हेदेखील त्यांनी सांगितलं आहे. योगराज सिंग यांचं वैयक्तिक आयुष्य वादळी राहिलं आहे.
विंटेज स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग म्हणाले की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे त्यांची पहिली पत्नी शबनम आणि मुलगा युवराज सिंग यांनी त्यांना सोडून दिले. ते म्हणाले, 'जेव्हा परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली की युवी आणि त्याची आई मला सोडून गेली, तेव्हा मला खूप धक्का बसला. ज्याच्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य आणि माझे संपूर्ण तारुण्य समर्पित केले होते तो गेला. खूप गोष्टी उद्ध्वस्त झाल्या. मी देवाला विचारले की हे सर्व का घडत आहे, जरी मी सर्वांशी चांगला वागलो होतो. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, पण मी एक निर्दोष व्यक्ती आहे. मी कधीही कोणाचेही वाईट केले नाही'.
advertisement
योगराज सिंग यांचं दुसरं लग्न
पहिले कुटुंब सोडून गेल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले, पण ती देखील त्यांना सोडून गेली. 'ही देवाची इच्छा होती आणि माझ्या नशिबात लिहिलेले होते. राग आणि सूड माझ्या मनात रुजला. मग क्रिकेट माझ्या आयुष्यात आले आणि मी तिथेच थांबलो. मी युवीला क्रिकेटची ओळख करून दिली. तो खेळला, पण त्याने मलाही सोडले. नंतर मी पुन्हा लग्न केले. मला दोन मुले झाली आणि जेव्हा ते मोठे झाले तेव्हा ते अमेरिकेत गेले. मी चित्रपटांमध्येही काम केले. काळ हळूहळू पुढे सरकत गेला, पण आता मी जिथे सुरुवात केली तिथे परत आलो आहे. मी स्वतःला विचारत आहे, मी हे सर्व का केले? आता तुमच्यासोबत कोणी आहे का?', असे प्रश्न सतत मला पडत आहेत.
advertisement
एकटे राहतात युवराजचे वडील
मुलाखतीदरम्यान, योगराज सिंग यांना विचारण्यात आले की ते त्यांचे दिवस कसे घालवतात. यावर ते म्हणाला, 'मी पूर्णपणे एकटा राहतो. छोट्या छोट्या गोष्टींसाठीही मला इतरांवर अवलंबून राहावे लागते. मी संध्याकाळी एकटाच बसतो. घरी कोणीच नसते. मी जेवणासाठी इतरांवर अवलंबून असतो. पण, मी कोणालाही त्रास देत नाही. जर मला भूक लागली तर कोणीतरी मला जेवण आणते. मी घरकामासाठी कर्मचारी आणि स्वयंपाकी देखील ठेवतो, पण ते वाढून निघून जातात', असं योगराज सिंग यांनी सांगितलं.
advertisement
'मला माझी आई, मुले, सुना, नातवंडे, माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर प्रेम आहे, पण मी काहीही मागत नाही. मी मरायला तयार आहे. माझे आयुष्य संपले आहे. देव जेव्हा इच्छितो तेव्हा मला त्याच्यासोबत घेऊन जाऊ शकतो. मी देवाचा खूप आभारी आहे. मी प्रार्थना करतो आणि तो सतत अन्न पुरवत राहतो', अशी भावनिक प्रतिक्रिया योगराज सिंग यांनी दिली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 11:10 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Yograj Singh : 'मी मरायला तयार... कुटुंबाने साथ सोडली', जेवणासाठीही दुसऱ्यावर अवलंबून, युवराजच्या वडिलांचा बांध फुटला!


