0 रनवर घेतल्या 5 विकेट... भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास घडला, 22 वर्षांच्या पोराने धडाधड मिळवले 8 बळी!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारतीय क्रिकेटची लाईफलाईन असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये नवा इतिहास रचला गेला आहे. 22 वर्षांच्या तरुण खेळाडूने एकही रन न देता 5 विकेट मिळवल्या आहेत.
मुंबई : भारतीय क्रिकेटची लाईफलाईन असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये नवा इतिहास रचला गेला आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये झालेल्या हरियाणा आणि सर्व्हिसेस यांच्यातल्या सामन्यात भारतीय क्रिकेटपटूने इतिहास घडवला आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकही रन न देता 5 विकेट घेण्याचा विक्रम झाला आहे. सर्व्हिसेसचा तरुण स्पिनर अमित शुक्लाने हा पराक्रम केला आहे. डावखुरा स्पिनर असलेला अमित शुक्ला या कामगिरीनंतर चर्चेत आला आहे.
16 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या सामन्यात पहिल्या दिवसापासूनच बॉलर्सचं वर्चस्व होतं. दिवसाअखेर एकूण 15 विकेट गेल्या, ज्याची सुरूवात सर्व्हिसेसच्या बॅटिंगने झाली. हरियाणाच्या फास्ट बॉलरच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्व्हिसेसचा पहिला डाव 205 रनवर संपला, पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी विक्रम घडला. अमित शुक्लाने एकही रन न देता 5 विकेट घेतल्या.
अमित शुक्लाने 6 ओव्हरमध्ये फक्त 1 रन देऊन 5 विकेट घेतल्या आणि मॅचचं चित्र बदललं. या 5 विकेट घेत असताना हरियाणाच्या बॅटरना अमित शुक्लाविरोधात एकही रन काढता आली नाही. मागच्या काही काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोणत्याही स्पिन बॉलरला असा दबदबा दाखवता आलेला नाही. अमित शुक्लाने अशी कामगिरी करून इतिहास घडवला आहे.
advertisement
उत्तर प्रदेशच्या फैजाबादचा असलेला अमित शुक्ला फक्त 22 वर्षांचा आहे. 2024 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अमितने आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये 32 विकेट घेतले आहेत. या सातत्यपूर्ण कामगिरीने अमित शुक्लाने निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमित शुक्लाने पहिल्या इनिंगमध्ये 20 ओव्हरमध्ये 27 रन देऊन हरियाणाच्या 8 विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे हरियाणाचा 111 रनवर ऑलआऊट झाला.
advertisement
अमित शुक्ला हा 14 वर्षांचा होईपर्यंत क्रिकेट खेळला नाही. नंतर त्याने लखनऊमधील भारतीय लष्कराच्या मैदानावर सराव सुरू केला. अमितचे वडील लष्करामध्ये जवान आहेत, ज्यांनी मुलाला क्रिकेटर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अमित शुक्ला याला 18 वर्षांचा असताना मॉडेलिंगच्या ऑफरही आल्या होत्या, पण त्याने क्रिकेट निवडले. सध्या अमित शुक्ला हा तरुण स्पिनर निवड समितीच्या नजरेत आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 10:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
0 रनवर घेतल्या 5 विकेट... भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास घडला, 22 वर्षांच्या पोराने धडाधड मिळवले 8 बळी!


