Prajakta Mali: मांसाहार करणाऱ्यांवर बरसली प्राजक्ता माळी, हानिकारक परिणाम सांगत स्पष्टच म्हणाली, “ते सडलेलं अन्न…”
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prajakta Mali: प्राजक्ताने एका मुलाखतीत मांसाहाराबद्दल मांडलेले मत सनसनाटी ठरत आहे.
मुंबई: मराठीतील सडेतोड आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री प्राजक्ता माळीने पुन्हा एकदा तिच्या आहार आणि जीवनशैलीवरील विचारांमुळे नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. अनेकदा आध्यात्मिक आणि फिटनेसवर बोलणाऱ्या प्राजक्ताने एका मुलाखतीत मांसाहाराबद्दल मांडलेले मत सनसनाटी ठरत आहे. तिने नॉनव्हेज खाणे कसे नैसर्गिक नाही आणि त्याचे आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम कसे असतात, याबद्दल तिने थेट भाष्य केले आहे.
मांस पचायला लागतात ७२ तास
प्राजक्ता माळीने सांगितले की, मांसाहार हा मानवी शरीरासाठी योग्यच नाही, कारण तो पचायला खूप वेळ घेतो. तिने स्पष्ट केलं, "मांसाहार पचायला तब्बल ७२ तास लागतात. विचार करा, ७२ तास मांस शरीरात तसेच राहिल्यास त्याची काय अवस्था होते? कोणताही प्राणी मृत झाल्यावर लगेचच त्याचे शरीर सडू लागते. आपण मांसाहाराच्या रूपात ते सडलेले अन्न खात असतो."
advertisement
Aishwarya Divorce : 'खूप ऐकून घेतलं, आता बस्स...'; घटस्फोटाच्या वावड्यांमुळे वैतागली ऐश्वर्या, अखेर काय ते सांगूनच टाकलं
"सडलेल्या गोष्टी तुमच्या शरीरात ठेवल्यामुळे तुमच्या नर्व्हस सिस्टिम आणि आचार-विचार, मनःस्थितीवर नक्कीच नकारात्मक परिणाम होतो," असे तिने ठामपणे सांगितले. प्राजक्ता केवळ मांसाहार टाळण्याबद्दलच बोलली नाही, तर निरोगी आणि तजेलदार दिसण्यासाठी कोणत्या दोन सवयी महत्त्वाच्या आहेत, हे देखील तिने सांगितले.
advertisement
प्राजक्ता प्रामुख्याने दोन नियमांचे पालन करते, पहिला म्हणजे उत्तम आहार आणि दुसरा म्हणजे उत्कृष्ट दिनचर्या. तिने स्पष्ट केले, "शिळे, पॅकेज फूड किंवा मैदा जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे जेवढे शक्य असेल तेवढे ताजे अन्न खा. लवकर झोपून पहाटे लवकर उठल्यास चेहऱ्यावर आपोआपच तेज येते. नुसते रात्री २-३ वाजेपर्यंत जागे राहून सौंदर्य मिळत नाही."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 10:30 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Prajakta Mali: मांसाहार करणाऱ्यांवर बरसली प्राजक्ता माळी, हानिकारक परिणाम सांगत स्पष्टच म्हणाली, “ते सडलेलं अन्न…”


