झहीर खानने दिला मोठा धक्का, LSG सोडचिठ्ठी; गोएंका विरुद्ध वाद उघड, त्रासला कंटाळून दिला राजीनामा

Last Updated:

Zaheer Khan: लखनऊ सुपर जायंट्सच्या मेंटॉरपदावरून झहीर खानने अचानक राजीनामा दिला आहे. मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि मालक संजीव गोएंका यांच्याशी मतभेद झाल्याने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

News18
News18
मुंबई: भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने (Zaheer Khan) लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाची साथ सोडली आहे. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी तो संघाचा मेंटॉर (Mentor) म्हणून आला होता. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार झहीर खानने गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी संजीव गोएंका यांच्या मालकीच्या फ्रँचायझीला आपल्या निर्णयाची माहिती दिली.
advertisement
झहीर खानने का सोडले एलएसजी?
झहीर खानने एकाच हंगामानंतर एलएसजी सोडण्याचे मुख्य कारण म्हणजे- संघासाठीची त्याचे Vision आणि मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर संघमालक संजीव गोएंका यांच्या विचारांशी जुळत नव्हते, असे वृत्त समोर आले आहे. झहीरचे एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंतसोबत (Rishabh Pant) चांगले संबंध होते. मात्र विस्कळीत विचारसरणीमुळे त्याला त्रास होत होता. ज्यामुळे आयपीएल 2025 च्या दुसऱ्या टप्प्यात एलएसजीची कामगिरी खालावली, असे मानले जाते.
advertisement
झहीर खानने 2011च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. त्याने आयपीएल 2025 साठी गौतम गंभीरच्या जागी एलएसजीचा मेंटॉर म्हणून पदभार स्वीकारला होता. ऑगस्ट 2024 मध्ये त्याने एलएसजीसोबत दोन वर्षांचा करार केला होता आणि तेव्हापासून तो खेळाडू निवड, नियोजन आणि रणनीती या कामांची जबाबदारी सांभाळत होता.
advertisement
एलएसजीची आयपीएल 2025 मधील कामगिरी
2025 च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली एलएसजीने लीग टप्प्यातील 14 पैकी 6 सामने जिंकले आणि 12 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही.
advertisement
लखनऊ संघात मोठे बदल
आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी एलएसजीने भारतीय वेगवान गोलंदाज मयंक यादवला 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. परंतु दुखापतीमुळे हा दिल्लीचा खेळाडू यंदाच्या हंगामात केवळ दोनच सामने खेळू शकला. त्यामुळे आयपीएल 2025 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरलेली एलएसजी आता आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनपूर्वी मयंकला सोडण्याची शक्यता आहे.
advertisement
या खेळाडूंनाही 'बाय-बाय'
मयंक यादव व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज मोहसीन खान, फिरकीपटू रवी बिश्नोई आणि दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मिलर यांनाही लखनऊ संघ सोडू शकतो. मोहसीन आणि बिश्नोई यांना आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी एलएसजीने कायम ठेवले होते. मात्र बिश्नोईने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही, तर मोहसीन दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही. दुसरीकडे डेव्हिड मिलर जो यापूर्वी आरआर, जीटी आणि पीबीकेएस संघांकडून खेळला आहे. त्याने 11 सामन्यांमध्ये केवळ 153 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्यालाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
advertisement
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
झहीर खानने दिला मोठा धक्का, LSG सोडचिठ्ठी; गोएंका विरुद्ध वाद उघड, त्रासला कंटाळून दिला राजीनामा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement