मुंबईला क्रीडा केंद्र बनवण्यासाठी ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन आणि एम.एस.एस.ए. यांची भागीदारी
- Published by:sachin Salve
Last Updated:
या करारानुसार मुंबई शालेय क्रीडा क्षेत्रातील एकूण २० क्रीडा क्षेत्रांचा विकास करण्यात येणार असून त्यामध्ये हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, अॅथलेटिक्स, टेबल टेनिस व बॅडमिंटन या खेळांवर विशेष लक्ष्य देण्यात येणार आहे.
मुंबई: ड्रीम स्पोर्ट्स या प्रख्यात क्रीडा संस्थेच्या, ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन (डी.एस.एफ.) या सामाजिक सेवा विभागाने भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित शालेय क्रीडा संस्थांपैकी एक असलेल्या मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन (एम.एस.एस.ए.) यांच्याशी पाच वर्षांसाठी भागीदारी करण्याची घोषणा केली. या करारानुसार मुंबई शालेय क्रीडा क्षेत्रातील एकूण २० क्रीडा क्षेत्रांचा विकास करण्यात येणार असून त्यामध्ये हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, अॅथलेटिक्स, टेबल टेनिस व बॅडमिंटन या खेळांवर विशेष लक्ष्य देण्यात येणार आहे.
advertisement
दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, यशस्वी जैस्वाल, पृथ्वी शॉ आणि यांच्यासारखे अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्या तारुण्यात स्पर्धा मध्ये खेळून घडले असून शहरातील क्रीडा विकासात एमएसएसएने ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. एमएसएसए यांनी डीएसएफच्या प्रयत्नातून क्रीडा क्षेत्रातील युवा खेळाडूंमध्ये स्पर्धात्मकता आणि कौशल्य वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एमएसएसए आणि डीएसएफच्या एकत्रित काम करण्यामुळे तळागाळातील क्रीडा गुणवत्तेचा विकास शक्य आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२४ यानुसार, स्पर्धा आयोजनातील दर्जा उंचावण्याचे या भागीदारीचे उद्देश्य आहे.
advertisement
- एमएसएसए सोबत पाच वर्षांची भागीदारी
- एकूण ४८४ सदस्य शाळा
- ६ ते १६ वयोगटातील ७५०० खेळाडूंचा सहभाग
- एकूण १७७ क्रीडा स्पर्धा
- २० क्रीडा प्रकार
ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनचे मुख्य संचालन अधिकारी व सह-संस्थापक श्री. भावत शेठ म्हणाले, “मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन बरोबर जोडले गेल्यामुळे, मुंबईच्या पायाभूत स्तरावर रुजलेल्या क्रीडा संस्कृतीशी सुद्धा जोडले जाण्याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राचा विकास करण्याच्या आमच्या मोहिमेशी ही योजना मिळती जुळती असून मुंबईतील युवा खेळाडूंना पाठबळा देऊन त्याच्यातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचा आणि भारताला क्रीडा महाशक्ती बनवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.”
advertisement
या भागीदारीच्या माध्यमातून मुंबईतील हजारो शालेय खेळाडूंमधील कौशल्य व तंदुरुस्ती यात वेगाने सुधारणा करून, स्थानिक स्पर्धाचा दर्जा उंचावण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच, युवा खेळाडूंना शारीरिक शिक्षण, प्रशिक्षक व क्रीडा प्रशिक्षक या सर्वांना आधुनिक प्रशिक्षण देऊन त्यांचाही दर्जा उंचावण्याचा डीएसएफचा प्रयत्न आहे. मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष रेव्हरंड ज्येष्ठ रॉड्रिक्स म्हणाले, “ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनशी भागीदारी केल्यामुळे मुंबईच्या क्रीडा क्षेत्राचे भवितव्य उज्वल व्हावे यासाठी आम्ही निश्चितपणे आगेकूच केली आहे. तसेच, या भागीदारीमुळे डीएसएफच्या महत्त्वाकांक्षी व भविष्याला गवसणी घालणाऱ्या योजनांच्या साहाय्याने मुंबईतील खेळाडू निश्चितपणे वेगाने प्रगती करतील अशी आमची खात्री आहे. इतकेच नव्हे तर मुंबईच्या दैदिप्यमान क्रीडा परंपरेच्या नव्या प्रवासाचा प्रारंभ होणार आहे.”
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2024 11:30 PM IST
मराठी बातम्या/Studio 18/
मुंबईला क्रीडा केंद्र बनवण्यासाठी ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन आणि एम.एस.एस.ए. यांची भागीदारी