घर सांभाळताना सोनियाने पाहिलं एक स्वप्न, मोठ्या जिद्दीने केलं पूर्ण; आज 'या' व्यवसायात आहे स्वतःची वेगळी ओळख!

Last Updated:

सोनिया, दिल्लीच्या जनकपुरीत राहणारी एक सामान्य गृहिणी, स्वतःसाठी दागिने बनवण्यापासून सुरुवात करत, आज ‘क्लीम’ नावाने यशस्वी दागिन्यांचा ब्रॅण्ड चालवत आहे. कोणताही...

Sonia jewellery brand
Sonia jewellery brand
सोनिया एकेकाळी एक सामान्य गृहिणी होत्या. त्यांचे आयुष्य कुटुंब आणि मुलांची काळजी घेण्यात जात होते, पण त्यांच्या मनात नेहमी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती. त्यांना स्वतःची एक वेगळी ओळख आणि नाव असावे असे वाटत होते. हेच स्वप्न घेऊन त्यांनी दोन वर्षांपूर्वी 'क्लीम' (Kleem) नावाचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला.
सोनिया सांगतात की, सुरुवातीला हे अजिबात सोपं नव्हतं. कोणताही व्यावसायिक अनुभव नसताना त्यांनी पितळ आणि चांदीचे दागिने बनवून विकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हळूहळू डिझायनिंग शिकली. वेगवेगळ्या ठिकाणाहून वस्तू गोळा केल्या. त्यानंतर जनकपुरीमध्ये एक छोटासा स्टुडिओ सुरू केला. सुरुवातीचे काही महिने खूप कठीण गेले, पण सोनियाने हार मानली नाही. आज त्या इतर महिलांसाठी एक प्रेरणा बनल्या आहेत.
advertisement
जाणून घ्या कशी केली सुरुवात?
सोनिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या ज्वेलरी ब्रँडची जाहिरात सुरू केली. त्यांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या सुंदर दागिन्यांचे फोटो शेअर केले आणि हळूहळू त्या लोकांचा विश्वास जिंकत आहेत. आज ज्वेलरी डिझाइनमध्ये त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे.
जाणून घ्या ही कल्पना कुठून आली
सोनिया सांगतात की, जेव्हा त्या स्वतःसाठी दागिने खरेदी करायला जायच्या, तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की, आपण स्वतः काहीतरी का बनवू नये? तिथूनच त्यांनी स्वतः दागिने बनवायला सुरुवात केली. हळूहळू कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींकडून त्यांना त्यांच्या दागिन्यांसाठी प्रशंसा मिळाली, मग त्यांनी हा व्यवसाय पुढे नेण्याचा विचार केला.
advertisement
दागिने ऑफलाइन आणि ऑनलाइन विकतात
दिल्लीच्या जनकपुरीमध्ये सोनियाचा स्टुडिओ आहे. जिथे त्या स्वतः डिझाइन बनवतात आणि तिथूनच ग्राहकांना ऑर्डर पाठवतात. त्यांनी ऑनलाइन विक्रीही सुरू केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत आपल्या दागिन्यांसह पोहोचत आहेत. सोनिया यांचे दागिने पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्हीचा संंगम आहेत. याचमुळे त्यांचे डिझाइन सर्व वयोगटातील महिलांना खूप आवडतात. दिल्लीतूनच नाही, तर देशातील इतर शहरांमधूनही लोक त्यांना दागिन्यांसाठी ऑर्डर करत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Success Story/
घर सांभाळताना सोनियाने पाहिलं एक स्वप्न, मोठ्या जिद्दीने केलं पूर्ण; आज 'या' व्यवसायात आहे स्वतःची वेगळी ओळख!
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement