स्वप्नात 'कुलदेवी'चे दर्शन होणं, शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ काय?

Last Updated:

हिंदू धर्मातील स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात कुलदेवीचे दर्शन होणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते. विशेषतः जर देवी हसताना दिसली तर हे कुटुंबासाठी अत्यंत शुभ मानले जाते. कार्यसिद्धी, अडथळ्यांचा नाश आणि...

Kuldevi in dream
Kuldevi in dream
हिंदू धर्मात अनेक प्रकारचे धर्मग्रंथ आहेत. त्यापैकीच एक आहे 'स्वप्नशास्त्र'. आपल्याला झोपताना जी स्वप्नं पडतात, त्या स्वप्नांचा अर्थही स्वप्नशास्त्रामध्ये सांगितला आहे. अनेकदा आपल्याला स्वप्नात देवदेवता दिसतात. जर तुम्हालाही असं स्वप्न पडलं असेल, तर स्वप्नात देवदेवता दिसणे हे एक खूप शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात देवदेवता दिसणे हे आपल्या नशिबाशी जोडलेले असते, असं मानलं जातं. उज्जैनचे आचार्य आनंद भारद्वाज यांच्याकडून जाणून घेऊया, स्वप्नशास्त्रामध्ये या स्वप्नांबद्दल काय सांगितलं आहे.
ही स्वप्ने खूप शुभ मानली जातात
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात कुलदेवी दिसणे हे खोल संकेत देते, पण जर कुलदेवी हसताना दिसल्या, तर ते कुटुंबासाठी खूप शुभ संकेत आहे.
स्वप्नशास्त्रानुसार, जर स्वप्नात कुलदेवीचे दर्शन झाले, तर याचा अर्थ त्या व्यक्तीला आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत आणि त्याच्या कुटुंबाचे रक्षण करत आहेत, असा होतो.
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात वारंवार कुलदेवीचे दर्शन होणे, हे कुटुंबातील सदस्यांसाठी चांगले दिवस सुरू होणार असल्याचा संकेत आहे. थांबलेली कामं मार्गी लागणार असल्याचं ते दर्शवतं.
advertisement
स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात कुलदेवीचे दर्शन झाले, तर याचा अर्थ कुटुंबावरील मोठे संकट टळले आहे, असा होतो. एखाद्या मोठ्या समस्येवर लवकरच तोडगा सापडणार असल्याचाही हा संकेत आहे.
स्वप्नात कुलदेवी रागावलेल्या दिसल्यास काय करावे?
स्वप्नात कुलदेवी प्रसन्न दिसल्यास खूप शुभ असतं, पण जर त्या रागावलेल्या दिसल्या, तर दिवा लावून कुलदेवीला प्रसन्न करता येते. रात्री झोपण्यापूर्वी कुलदेवीजवळ तुपाचा दिवा लावावा आणि डोळे मिटून ध्यान करावे. नकळत झालेल्या चुकांसाठी, पापांसाठी कुलदेवीकडे माफी मागावी. त्यानंतर कुटुंबाच्या रक्षणासाठी त्यांची प्रार्थना करावी, यामुळे आशीर्वाद मिळतो.
advertisement
मराठी बातम्या/अध्यात्म/
स्वप्नात 'कुलदेवी'चे दर्शन होणं, शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement