Fire-Boltt Oracle : या स्मार्टवॉचने अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले! 4G सपोर्टसह ॲप्सही इन्स्टॉल करता येणार

Last Updated:

Fire-Boltt Oracle स्मार्टवॉच भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून अँड्रॉईड ॲप्स चालवता येतात.

या स्मार्टवॉचने अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले
या स्मार्टवॉचने अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले
मुंबई : सध्या स्मार्ट गोष्टींचा जमाना आहे. घरातील टीव्हीपासून हातातील मोबाईन आणि घड्याळही स्मार्ट झालं आहे. आता पूर्वीसारखे काट्याच्या घड्याळांपेक्षा स्मार्टवॉचला लोक अधिक पसंती देत आहेत. तुम्हालाही हातात चमचमतं स्मार्ट वॉच घालण्याची इच्छा असेल पण बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी बेस्ट डील घेऊन आलो आहोत. Fire-Boltt Oracle स्मार्टवॉच अधिकृतपणे भारतात लॉन्च करण्यात आले आहे. यात 4G LTE सपोर्ट आहे. यामध्ये यूजर्स 4G कनेक्टिव्हिटीसाठी नॅनो-सिम वापरू शकतात. विशेष गोष्ट म्हणजे या घड्याळात Google Play Store वरून Android ॲप्स चालवता येतात. यात फिरणारा रोटेटिंग क्राउन आणि फंक्शन बटणासह चौरस डायल डिझाइन आहे.
फायर-बोल्ट ओरॅकल स्मार्टवॉचची प्रस्तावित किंमत 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ते ब्लॅक क्रोम, क्लाउड-व्हिस्पर, क्लाउडी-क्लॅप आणि क्रिस्टल-टाइड अशा अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. ग्राहक कंपनीच्या अधिकृत साइटवरून ते खरेदी करू शकतात.
फायर बोल्ट ओरॅकलमध्ये 320 X 360 पिक्सेल, 600nits ब्राइटनेस आणि 60Hz रिफ्रेश रेटसह 1.96 HD डिस्प्ले आहे. सिलेक्शन आणि नेव्हिगेशनसाठी एक फिरणारा क्राउन आणि एक फंक्शनल बटण आहे. ग्राहकांना स्ट्रैप्ससाठी अनेक पर्यायही मिळतील.
advertisement
फायर बोल्ट ओरॅकलमध्ये 2GB रॅमसह 16GB स्टोरेज आहे. यामध्ये जीपीएस, ब्लूटूथ आणि वाय-फायचाही सपोर्ट आहे. यामध्ये ग्राहक प्ले स्टोअरमध्ये एक्सेस करू शकतात. वॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटर आणि अनेक स्पोर्ट्स मोडही दिलेले आहेत. घड्याळाची बॅटरी 700mAh असून ती 36 तास सामान्य वापरासाठी वापरली जाऊ शकते.
वाचा - IPL चाहत्यांसाठी परफेक्ट राहतील हे रिचार्ज पॅक! फक्त 39 रुपयांत होईल काम
या घड्याळात ग्राहकांना क्लाउड-आधारित घड्याळाचे फेस मिळतील. यात क्वाड-कोर सीपीयू आणि Mali T820 MP1 GPU आहे. घड्याळात इन-बिल्ट माइक, व्हॉइस असिस्टंट आणि स्पीकर आहे. हे स्मार्टवॉच डस्ट आणि वाटर रेजिस्टेंससाठी IP67 रेट केलेले आहे. यात LTE कॉलिंग सपोर्ट देखील आहे.
advertisement
कुठल्याही महागड्या स्मार्टवॉचला टक्कर देईल
सध्या बाजारात अनेक प्रकारचे स्मार्ट वॉच उपलब्ध आहेत. यात अगदी हजार रुपयांपासून लाख रुपयांपर्यंत स्मार्टवॉच मिळतात. मात्र, फायर बोल्टचे हे वॉच अनेक महागड्या घड्याळ्यांना तगडे आव्हान देऊ शकते. यातील अनेक फीचर्स एकदम नवीन आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये हा एक उत्तम पर्याय मानला जाऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
Fire-Boltt Oracle : या स्मार्टवॉचने अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले! 4G सपोर्टसह ॲप्सही इन्स्टॉल करता येणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement