Amazon Great Indian Festival सेलमध्ये जिंकता येईल 5 हजार रुपयांचं व्हाउचर, पण कसं?
- Published by:sachin Salve
Last Updated:
अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना पाच हजार रुपयांचं व्हाउचर जिंकण्याची संधी देणार आहे.
सणासुदीचा काळ म्हणजे खरेदीसाठी सुवर्णसंधी मानली जाते. या काळात ग्राहकांसोबत विक्रेते देखील खूश असतात. गणपती आणि नवरात्र उत्सवापासूनच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खरेदीच्या ऑफर सुरू होतात. काही दिवसातच अॅमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर मोठा शॉपिंग फेस्टिव्हल सुरू होणार आहे. दिवाळीपूर्वी फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी अॅमेझॉनने विशेष तयारी केल्याचं दिसत आहे. इलेक्ट्रॉनिक्ससह इतर अनेक वस्तू अॅमेझॉनवर उत्तम डील आणि ऑफर्ससह उपलब्ध होणार आहेत. 27 सप्टेंबर 2024 पासून अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना पाच हजार रुपयांचं व्हाउचर जिंकण्याची संधी देणार आहे.
27 सप्टेंबरपासून अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू होणार आहे. याआधी अॅमेझॉनने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक कॉन्टेस्ट सुरू केली आहे. या अंतर्गत विजेत्याला पाच हजार रुपयांचं व्हाउचर जिंकण्याची संधी दिली जात आहे.
अॅमेझॉनच्या या स्पर्धेत भाग घेणं अतिशय सोपं आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी 27 ही संख्या दिसेल तिचा फोटो काढा किंवा स्क्रीनशॉट घ्या. तुम्ही काढलेला फोटो किंवा स्क्रीनशॉट अॅमेझॉन कॉन्टेस्टच्या पोस्टवरील कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. हे फोटो शेअर करताना त्यासोबत #TaiyaariKaTyohaar आणि #AmazonGreatIndianFestival हे हॅशटॅग आठवणीने वापरावेत.
advertisement
#ContestAlert: The countdown to the #AmazonGreatIndianFestival begins!
If you spot the number 27 anywhere around, you could be one of the lucky winners to win Amazon vouchers worth Rs.5000!
Follow the rules & let the hunt for 27 begin!#AmazonGreatIndianFestival… pic.twitter.com/tZ4rOGyqMx— Amazon India (@amazonIN) September 24, 2024
advertisement
@AmazonIn ला टॅग करून तीन मित्रांना इन्व्हाइट करावं लागेल. यासाठी काही अटी आणि शर्तीही लागू आहेत. स्पर्धेतील सहभागींचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे, गरजेचं आहे. या स्पर्धेतील तीन विजेत्यांना अॅमेझॉन पाच रुपयांचे व्हाउचर देईल. 26 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत या स्पर्धेत भाग घेता येऊ शकतो. 7 नोव्हेंबर रोजी विजेत्यांची घोषणा केली जाईल. विजेत्यांनी घोषणेच्या 30 दिवसांच्या आत त्यांची माहिती शेअर करणं गरजेचं आहे.
advertisement
अॅमेझॉन या सेलमध्ये विविध कंपन्यांच्या लेटेस्ट फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, कपडे, कॉस्मेटिक्स, होम डेकोरेशनच्या वस्तूंवर भरघोस सूट दिली जाणार आहे. अॅमेझॉनच्या प्राईम मेंबर्ससाठी 26 सप्टेंबरपासूनच सेल सुरू करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2024 10:50 AM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Amazon Great Indian Festival सेलमध्ये जिंकता येईल 5 हजार रुपयांचं व्हाउचर, पण कसं?