OnePlus 13 लॉन्च होण्यापूर्वी स्वस्त झाले 3 स्मार्टफोन! मिळतंय जबरदस्त डिस्काउंट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
OnePlus 12 Discount Offer: तुम्ही OnePlus वरून नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर Amazon ने तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आणली आहे. आजकाल 3 स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया
OnePlus 12 Discount Offer: OnePlus 13 लवकरच लॉन्च होणार आहे. ज्याची लॉन्च डेट देखील निश्चित झाली आहे. कंपनी 7 जानेवारी 2025 रोजी जागतिक बाजारपेठेत आणि भारतात हे नवीन डिव्हाइस लॉन्च करेल. याआधी कंपनी सध्याच्या मॉडेल्सवर प्रचंड डिस्काउंट ऑफर देत आहे. जसजसा इव्हेंट जवळ येत आहे, वनप्लस 12 ची किंमत बरीच कमी झाली आहे. कंपनीचा लास्ट जनरेशन फ्लॅगशिप फोन Amazon वर मोठ्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे. इतकेच नाही तर आणखी दोन डिव्हाइसही अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहेत. OnePlus 12 पहिल्यांदा जानेवारी 2024 मध्ये लॉन्च झाला होता.
हे Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह सुसज्ज आहे, यात जबरदस्त 120Hz कर्व्ड AMOLED डिस्प्ले, मोठी बॅटरी, फास्ट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगसह इतर अनेक फीचर आहेत. तुम्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन शोधत असाल पण तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतील, तर OnePlus 12 आता फक्त 52,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ॲमेझॉन बँक ऑफरसह उत्तम इंस्टेंट डिस्काउंट देत आहे. चला संपूर्ण डीलविषयी जाणून घेऊया.
advertisement
OnePlus 12 डिस्काउंट ऑफर
OnePlus 12 Amazon वर 12GB RAM अधिक 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 59,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लिस्टेड आहे. या फोनची लॉन्च किंमत 64,999 रुपये होती. म्हणजेच तुम्हाला यावर मोठं डिस्काउंट मिळतंय. 16GB रॅम प्लस 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 64,999 रुपये आहे, जी 69,999 रुपयांच्या लॉन्च किंमतीपेक्षा कमी आहे. म्हणजेच हे डिव्हाइस त्याच्या दोन्ही व्हेरिएंटसाठी 5,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट ऑफरसह उपलब्ध आहे.
advertisement
त्याच वेळी, जर तुमच्याकडे ICICI बँक क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्ही चेकआउटच्या वेळी अतिरिक्त 7,000 रुपयांची फ्लॅट बँक सूट घेऊ शकता. यासह, OnePlus 12 च्या 12GB रॅम व्हेरिएंटची किंमत फक्त 52,999 रुपये आणि 16GB रॅम व्हेरिएंटची किंमत 57,999 रुपये झाली आहे. जर तुमच्याकडे ICICI बँक क्रेडिट कार्ड नसेल आणि तरीही तुम्हाला या डीलचा आनंद घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे OneCard क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. OneCard वर 7,000 रुपयांचं हीच इंस्टंट बँक डिस्काउंट ऑफर देखील उपलब्ध आहे.
advertisement
OnePlus 12R आणि OnePlus Nord 4 5G वर सूट
इतकंच नाही तर Amazon OnePlus 12R आणि OnePlus Nord 4 5G वरही डिस्काउंट देत आहे. जे मिड रेंज प्राइजमध्ये शानदार फीचर्स ऑफर करत आहेत. सर्वप्रथम, जर आपण OnePlus 12R बद्दल बोललो तर, हे डिव्हाइस सध्या फक्त 38,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर कंपनीने तो 45,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. त्याच वेळी, OnePlus Nord 4 5G जो 29,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता तो आता Amazon वर केवळ 27,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एवढेच नाही तर फोनवर 2000 रुपयांचं बँक डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 25, 2024 1:58 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
OnePlus 13 लॉन्च होण्यापूर्वी स्वस्त झाले 3 स्मार्टफोन! मिळतंय जबरदस्त डिस्काउंट










