Flipkart की Amazon? कुठे मिळतोय सर्वात iPhone, कोणता मॉडल कुठून घ्या वाचा Best Deal
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पहिल्यांदाच iPhone घ्यायचा असेल किंवा जुना मॉडेल अपग्रेड करायचा असेल, तर हा सर्वोत्तम काळ आहे. मात्र, या ऑफर्स मर्यादित स्टॉकपुरत्याच आहेत आणि काही मॉडेल्स तर आधीच आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत.
मुंबई : सणासुदीचा काळ आला की भारतात ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर भन्नाट डिस्काउंटची रेलचेल सुरू होते. Flipkart आणि Amazon सारख्या दिग्गज ई-कॉमर्स कंपन्या Big Billion Days आणि Great Indian Festival या सेलमध्ये Apple iPhone सीरीजवर भन्नाट ऑफर घेऊन आल्या आहेत. यंदा iPhone 14 पासून ते iPhone 16 सीरीजपर्यंत आकर्षक सवलती मिळत आहेत. पहिल्यांदाच iPhone घ्यायचा असेल किंवा जुना मॉडेल अपग्रेड करायचा असेल, तर हा सर्वोत्तम काळ आहे. मात्र, या ऑफर्स मर्यादित स्टॉकपुरत्याच आहेत आणि काही मॉडेल्स तर आधीच आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत.
iPhone 14
iPhone 14 या सेलमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. Flipkart आणि Amazon वर याचा 128GB व्हेरिएंट फक्त ₹54,999 मध्ये मिळत आहे, जी आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे. यात A15 Bionic चिप, सुपर रेटिना XDR डिस्प्ले आणि 12MP ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. फ्रंट कॅमेरा देखील 12MP आहे ज्यात नाईट मोड आणि 4K व्हिडिओ सपोर्ट आहे. बॅटरी सहजपणे एक दिवस टिकते. iPhone वापरण्याचा पहिलाच अनुभव घ्यायचा असल्यास हा उत्तम पर्याय आहे.
advertisement
iPhone 15
iPhone 15 चा 128GB व्हेरिएंट Amazon वर ₹47,999 ला आणि Flipkart वर ₹59,999 ला मिळतो. यात A16 Bionic चिप आणि iOS 18 सपोर्ट आहे ज्यामुळे परफॉर्मन्स आणि बॅटरी दोन्ही उत्तम आहेत. 48MP प्रायमरी कॅमेरा प्रो-लेव्हल क्वालिटी देतो, तर 12MP अल्ट्रा-वाइड लेन्ससुद्धा आहे. 6.1-इंचचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले HDR10 आणि Dolby Vision सपोर्टसह येतो. मध्यम बजेटमध्ये हाय-एंड फीचर्स हवे असतील तर iPhone 15 योग्य ठरेल.
advertisement
iPhone 16
नुकताच लाँच झालेला iPhone 16 Flipkart वर ₹69,900 पासून आणि Amazon वर ₹69,499 पासून उपलब्ध आहे. यात Apple चा नवा A18 चिपसेट दिला आहे, जो परफॉर्मन्स आणि ग्राफिक्स अधिक स्मूद करतो. 6.1-इंच OLED डिस्प्ले, अचूक रंग आणि उत्तम ब्राइटनेस देतो. यात 48MP वाइड आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, तसेच 12MP ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा मिळतो. सुधारित बॅटरी ऑप्टिमायझेशनमुळे एक चार्ज दिवसभर पुरतो.
advertisement
iPhone 16 Pro
iPhone 16 Pro चा 256GB व्हेरिएंट Flipkart वर ₹1,19,999 मध्ये उपलब्ध आहे, तर Amazon वर सध्या आऊट ऑफ स्टॉक आहे. यात A18 Pro चिपसेट, 6.1-इंच ProMotion OLED डिस्प्ले (120Hz रिफ्रेश रेटसह) मिळतो. कॅमेरा सेटअपमध्ये 48MP मेन, 12MP अल्ट्रा-वाइड आणि 12MP टेलिफोटो लेन्स आहे. फ्रंट कॅमेरामध्ये FaceID आणि अॅडव्हान्स्ड व्हिडीओ फीचर्स दिलेले आहेत.
advertisement
iPhone 16 Pro Max
Apple चा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन iPhone 16 Pro Max, Flipkart वर ₹1,32,999 ला आणि Amazon वर ₹1,30,900 ला मिळतो. यात 6.9-इंच ProMotion OLED डिस्प्ले (120Hz रिफ्रेश रेटसह) आहे. कॅमेरा सिस्टममध्ये 48MP मेन, 12MP अल्ट्रा-वाइड आणि 5x टेलिफोटो झूम लेन्स मिळते. A18 Pro चिपसेट आणि मोठी बॅटरी यामुळे हे मॉडेल लांब वेळेपर्यंत उत्कृष्ट परफॉर्मन्स देते.
advertisement
थोडक्यात सांगायचं झालं तर, या सणासुदीच्या सेलमध्ये iPhone घेण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे. पण लक्षात ठेवा स्टॉक मर्यादित आहे आणि डील्स कधीही संपुष्टात येऊ शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 6:20 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Flipkart की Amazon? कुठे मिळतोय सर्वात iPhone, कोणता मॉडल कुठून घ्या वाचा Best Deal