iPhone 15 खरेदी करावा की, iPhone 16ची वाट पहावी? नव्या सीरीजमध्ये काय अपडेट?
- Published by:Aaditi Datar
- trending desk
Last Updated:
स्मार्टफोनमध्ये 3,561mAh बॅटरी दिली जाऊ शकते. याशिवाय, कंपनी 40W वायर्ड चार्जिंग आणि 20W MagSafe चार्जिंग सपोर्ट देऊ शकते.
मुंबई : तुम्ही आयफोनचे चाहते असाल आणि नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या आयफोन 15 मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि आयफोन 16 लवकरच लाँच होणार आहे. मार्केटमध्ये आयफोन 16 सीरिजशी संबंधित अनेक रिपोर्ट्स येत आहेत. काही डिटेल्स लीक झाल्याचे रिपोर्ट्सही येत आहेत. त्यामुळे आयफोन 15 विकत घ्यावा की आयफोन 16 याबद्दल काही जण गोंधळले आहेत. कोणता फोन घेणं योग्य राहिल, ते जाणून घेऊ या. या संदर्भात 'आज तक'ने वृत्त दिलंय.
सध्याची आयफोन सीरिज चांगली आहे, परंतु आगामी आयफोन 16मध्ये आपल्याला नवीन डिझाइन पाहायला मिळणार आहे. याशिवाय कंपनी नवीन फीचर्सदेखील देणार आहे. लीक झालेल्या रिपोर्टमध्ये या फीचर्सचा खुलासा झाला असला, तरी कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
काय असतील आयफोन 16 ची स्पेसिफिकेशन्स?
लीक झालेल्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला, तर iPhone 16 मध्ये A17 प्रोसेसर असू शकतो. तो iPhone 15 Pro सीरिजमध्ये वापरल्या गेलेल्या A17 Pro पेक्षा वेगळा असेल. फोनच्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले असेल. स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल.
advertisement
स्मार्टफोनमध्ये 3,561mAh बॅटरी दिली जाऊ शकते. याशिवाय, कंपनी 40W वायर्ड चार्जिंग आणि 20W MagSafe चार्जिंग सपोर्ट देऊ शकते. चार्जिंगशी संबंधित हेच डिटेल्स आयफोन 15 सीरिजसाठी देखील आल्या होत्या. परंतु असं काहीही फोनमध्ये देण्यात आलं नाही. कंपनी यावर्षी चांगल्या चार्जिंग स्पीडसह नवीन फोन लाँच करील अशी अपेक्षा आहे.
आयफोन 15 विकत घ्यावा की आयफोन 16
ॲपलच्या लेटेस्ट फोनमध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळत आहे. कंपनीने आयफोन 15 सीरिजच्या सर्व फोन्समधून नॉच काढून टाकला आहे. आता नवीन आयफोनची वाट पाहावी की नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. तुमचा फोन जुना झाला असेल आणि तुम्हाला लवकरच नवीन फोन घ्यायचा असेल तर तुम्ही आयफोन 15 सीरिजचा फोन खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला नवीन कॅमेरा सेटअप, नवीन डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसर मिळेल.
advertisement
दुसरीकडे, जर तुम्हाला नवीन फोनची जास्त गरज नसेल, तर तुम्ही आयफोन 16 सीरिजच्या लाँचिंगची वाट पाहू शकता. तुम्हाला लेटेस्ट फीचर्स असलेला फोन मिळेल. तसंच, आयफोन 15 सीरिजची किंमतही कमी होणार आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही लेटेस्ट फीचर्स असलेला फोन निवडू शकता किंवा स्वस्तात आयफोन 15 खरेदी करू शकता. एकंदरीतच आयफोन 16 लाँच झाल्यानंतर तुम्हाला फायदेशीर डील्स मिळू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 09, 2024 2:12 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
iPhone 15 खरेदी करावा की, iPhone 16ची वाट पहावी? नव्या सीरीजमध्ये काय अपडेट?