'मी मुस्लीम तरी भगवा रंग...' हातात iphone 17 येताच तरुण भावुक, आधी किस्स केलं मग...

Last Updated:

Apple च्या iPhone 17 सीरिजमध्ये Cosmic Orange रंगाचा फोन तुफान लोकप्रिय ठरला, BKC व दिल्लीतील स्टोअरमध्ये ग्राहकांची गर्दी व हाणामारी, स्टॉक तीन दिवसांत संपला.

News18
News18
Apple ने आयफोन 17 सीरिज आजपासून विक्रीला आणली आहे. पहाटेपासून अॅपलच्या शोरुमबाहेर ग्राहकांनी लांबच्या लांब रांगा लावल्या आहेत. BKC मध्ये रांगे तुफान राडा देखील झाला. स्टोअरमध्ये पहिलं कोण जाणार आणि रांगेत घुसण्याच्या कारणावरुन तुफान हाणामारी झाली. स्टोअरच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्ती केली मात्र त्यांच्याही अंगावर लोक धावून गेल्याचा प्रकार समोर आला. त्याच वेळी आयफोन ज्यांनी पहिल्यांदा खरेदी केला त्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला.
ऍपलने नुकत्याच लाँच केलेल्या आयफोन 17 सीरिजमधील कॉस्मिक ऑरेंज (भगव्या) रंगाच्या फोनने ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली. ह्या रंगाचा फोन प्री बुकिंगमध्येच आऊट ऑफ स्टॉक झाला होता. दिल्लीतील एका ऍपल स्टोअरमधून हा नवा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी एका मुस्लीम ग्राहकाने कॉस्मिक ऑरेंज रंगाचा फोन खरेदी केल्यावर आपला आनंद व्यक्त केला.
advertisement
तो ग्राहक म्हणाला, "मी सकाळपासून रांगेत उभा होतो आणि मला या रंगाचा आयफोन विकत घेतल्याचा खूप आनंद आहे. मला खात्री आहे की, भारतात हा भगव्या रंगाचा फोन खूप लोकप्रिय होईल. मी मुस्लिम असलो तरी मला हा रंग खूप आवडला आहे, असं म्हणत त्याने आपण विकत घेतलेल्या फोनला किस्स करत आनंद व्यक्त केला"
advertisement
अॅपलने पहिल्यांदाच हा रंग लाँच केला आणि त्यातही सर्वात जास्त लोकप्रिय ठरला आहे. Apple च्या नव्या iPhone 17 Pro Max ने लाँच होताच धुमाकूळ घातला आहे. विशेषतः या फोनच्या कॉस्मिक ऑरेंज रंगाची मागणी इतकी प्रचंड आहे की, अमेरिका आणि भारत दोन्ही देशांमध्ये अवघ्या तीन दिवसांतच त्याचा संपूर्ण स्टॉक संपला आहे. भारतात तर Apple च्या अधिकृत स्टोअर्समध्येही सध्या हा फोन इन-स्टोअर पिकअपसाठी उपलब्ध नाही.
advertisement
कॉस्मिक ऑरेंज एवढा खास का?
Apple च्या तज्ज्ञांनुसार, iPhone 17 Pro Max Cosmic Orange साठी मोठ्या प्रमाणात प्री-बुकिंग झाली, ज्यामुळे तो इतक्या लवकर विकला गेला. कॉस्मिक ऑरेंज हा रंग iPhone 17 सीरिजमध्ये पहिल्यांदाच हा रंग आणला आहे. त्याचा आकर्षक प्रीमियम मॅट फिनिश ग्राहकांना खूप आवडला आहे. वाढती मागणी लक्षात घेता, कंपनी आता या रंगाचा नवीन स्टॉक लवकरच उपलब्ध करण्यासाठी काम करत आहे.
advertisement
advertisement
किती रुपयांना मिळणार आयफोन
iPhone 17 256GB - 82,900 रुपये
iPhone 17 512GB - 1,02,900 रुपये
iPhone Air 256GB - 1,19,900 रुपये
iPhone Air 512GB - 1,39,900 रुपये
iPhone Air 1TB - 1,59,900 रुपये
iPhone 17 Pro 256GB - 1,34,900 रुपये
iPhone 17 Pro 512GB - 1,54,900 रुपये
advertisement
iPhone 17 Pro 1TB - 1,74,900 रुपये
iPhone 17 Pro Max 256GB - 1,49,900 रुपये
iPhone 17 Pro Max 512GB - 1,69,900 रुपये
iPhone 17 Pro Max 1TB -1,89,900 रुपये
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
'मी मुस्लीम तरी भगवा रंग...' हातात iphone 17 येताच तरुण भावुक, आधी किस्स केलं मग...
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement