advertisement

BSNLने लॉन्च केला 90 दिवसांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन! सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी रोजचा खर्च फक्त 2 रुपये

Last Updated:

BSNL ने 90 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने, कंपनीने एक नवीन मोबाइल टेरिफ सादर केला आहे, ज्यामध्ये यूझर्ससाठी हा प्लॅन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये युजर्सला दररोज 2 रुपये खर्च करावे लागतील.

बीएसएनएल रिचार्ज प्लॅन
बीएसएनएल रिचार्ज प्लॅन
मुंबई : BSNL ने या वर्षासाठी मोबाईल टॅरिफची लिस्ट जाहीर केली आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीने रिचार्ज प्लॅनचे दर वाढवलेले नाहीत. परंतु कंपनीने अनेक नवीन प्लॅन जाहीर केले आहेत. ज्यामध्ये कमी किंमतीत यूझर्सना दीर्घ व्हॅलिडिटी ऑफर केली जात आहे. BSNL ने 90 दिवसांचा असाच एक स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे, ज्यामध्ये यूझर्सना 2 रुपयांपेक्षा कमी दराने दीर्घ व्हॅलिडिटी, कॉलिंग आणि डेटा ऑफर केला जात आहे.
BSNL च्या पश्चिम बंगाल टेलिकॉम सर्कलने 1 जानेवारी 2025 पासून नवीन मोबाइल दरांची घोषणा केली आहे. BSNL पश्चिम बंगालने त्यांच्या अधिकृत X हँडलवर प्रीपेड आणि पोस्टपेड दरांची यादी शेअर केली आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीच्या अनेक रिचार्ज प्लॅन देशातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये सारख्याच आहेत. अशा परिस्थितीत, इतर कोणत्याही टेलिकॉम सर्कलमध्येही तुम्हाला हे फायदे मिळू शकतात.
advertisement
BSNL चा 90 दिवसांचा प्लॅन
भारत संचार निगम लिमिटेडने पश्चिम बंगाल टेलिकॉम सर्कलसाठी आणलेल्या या रिचार्ज प्लॅनसाठी यूझर्सना फक्त 201 रुपये खर्च येतो. म्हणजेच, दररोज सुमारे 2 रुपये खर्च करून या प्लॅनचा लाभ मिळू शकतो. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यूझर्सना 90 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते.
कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना भारतात कुठेही कॉल करण्यासाठी 300 मिनिटे मिळतात. याशिवाय या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 6GB डेटा आणि 99 फ्री SMS चा लाभ मिळतो. BSNL ने हा प्लॅन खासकरून त्या यूझर्ससाठी लॉन्च केला आहे जे GP2 म्हणजेच ग्रेस पिरियड 2 मध्ये आहेत. हे ते यूझर्स आहेत ज्यांची सिम व्हॅलिडिटी एक्सपायर होऊन 8 ते 165 दिवस झाले आहेत.
advertisement
नियमित यूझर्ससाठी, BSNL चा 90 दिवसांचा प्लॅन 411 रुपयांमध्ये येतो. या प्लॅनमध्ये यूझर्सना भारतभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय यूजर्सना फ्री नॅशनल रोमिंगचाही लाभ मिळणार आहे. हा प्लॅन दररोज 2GB डेटा आणि 100 मोफत SMS सह येतो.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
BSNLने लॉन्च केला 90 दिवसांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन! सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी रोजचा खर्च फक्त 2 रुपये
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement