चीनची नवी चाल, Gaming App मधून भारतातल्या मुलांना करतायत टार्गेट

Last Updated:

भारत आणि चीन यांच्या संबंधातल्या चढ-उतारांनुसार चिनी मालावर भारताची करडी नजर असते. मोबाइल अ‍ॅप्सच्या बाजारपेठेतल्या चिनी अ‍ॅप्सची संख्या मात्र चिंताजनक आहे.

चीनची नवी चाल, Gaming App मधून भारतातल्या मुलांना करतायत टार्गेट
चीनची नवी चाल, Gaming App मधून भारतातल्या मुलांना करतायत टार्गेट
मुंबई : बाजारपेठ मग ती प्लास्टिकच्या वस्तूंची असो की मोबाइल अ‍ॅप्सची, चीन आणि चिनी उत्पादनांनी ती व्यापली आहे हे आपण जाणतोच. भारत आणि चीन यांच्या संबंधातल्या चढ-उतारांनुसार चिनी मालावर भारताची करडी नजर असते. मोबाइल अ‍ॅप्सच्या बाजारपेठेतल्या चिनी अ‍ॅप्सची संख्या मात्र चिंताजनक आहे. कारण ही अ‍ॅप्स भारतातल्या लहान मुलांना ग्राहक म्हणून आकर्षित करुन घेत आहेत.
बेबी बस कंपनीची चिनी अ‍ॅप्स भारतात प्रसिद्ध आहेत. त्यांची 200 पेक्षा जास्त अ‍ॅप्स आहेत. ही अ‍ॅप्स भारत आणि इंडोनेशियात अत्यंत लोकप्रिय आहेत. मुलांसाठी उपलब्ध असलेल्या टॉप अ‍ॅप्समध्ये बेबी बसची तीन अ‍ॅप्सही आहेत. खरं तर गेल्या काही वर्षांत भारत सरकारने किती तरी चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणली आहे' पण बेबी बसची अ‍ॅप्स मात्र अजूनही आपल्याकडे चांगलीच लोकप्रिय आहेत. एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार, ही अ‍ॅप्स भारतीयांचा बराच महत्त्वाचा डेटा वापरतात, साठवतात. त्यामुळेही त्यांचा वापर हिताचा नाही. या कंपनीकडून लहान मुलांसाठी 25 किंवा 50 नाही, तर 200 मोबाइल अ‍ॅप्स चालवली जातात.
advertisement
सेन्सर टॉवर या इंटेलिजन्स फर्मच्या रिपोर्टनुसार बेबी बस या कंपनीची अ‍ॅप्स आपल्याकडे भरपूर लोकप्रिय आहेत. 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत 60 टक्के शेअर या अ‍ॅप्सचा आहे. इनकॉग्नीच्या माहितीनुसार टॉप 11 पैकी 3 डेटा हंग्री अ‍ॅप्स ही लहान मुलांचीच अ‍ॅप्स असून ती बेबी बसकडूनच डेव्हलप करण्यात आली आहेत. बेबी पांडा वर्ल्ड या गेम अ‍ॅपने आता पर्यंत 100 मिलियन डाउनलोड्स क्रॉस केले आहेत. बेबी बस किड्स व्हिडिओ अँड गेम वर्ल्ड या अ‍ॅपचे 10 मिलियन डाऊनलोड्स आहेत. बेबी पांडा किड्स प्ले या अ‍ॅपचेसुद्धा 10 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड्स आहेत. ही सगळी अ‍ॅप्स भारतात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.
advertisement
इनकॉग्नीचे प्रवक्ता सांगतात, भारतात मुलांसाठी उपलब्ध असलेल्या टॉप अ‍ॅप्समध्ये चार अ‍ॅप्स बेबी बस कंपनीची आहेत. लिटिल पांडा प्रिन्सेस मेक अप हे अ‍ॅप चौथ्या क्रमांकावर आहे. लिटिल पांडाज आइस्क्रीम गेम पाचव्या क्रमांकावर, लिटिल पांडा स्वीट बेकरी सातव्या, तर बेबी पांडा स्कूल बस नवव्या क्रमांकावर आहे.
ही अ‍ॅप मोबाइलमध्ये असतील तर त्या मोबाइल वापराचा किती तरी डेटा ती साठवत असतात असंही एका रिपोर्टमधून समोर आलंय. त्या डेटाचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. त्यामुळे अशी अ‍ॅप आपल्या मोबाइलमध्ये ठेवायची की नाही हे पालकांनीच आता ठरवायला हवं.
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
चीनची नवी चाल, Gaming App मधून भारतातल्या मुलांना करतायत टार्गेट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement