श्रीमंत लोकांचा विषय वेगळा, elon musk झाला एक डझन लेकरांचा बाप!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
हे अपत्य मुलगा आहे की मुलगी आणि त्याचं नाव काय, याबद्दल अद्याप काहीही जाहीर करण्यात आलेलं नाही.
मुंबई: टेस्ला कंपनीचे सीईओ आणि एक्स (ट्विटर) कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आता ते चर्चेत आले आहेत त्यांच्या बाराव्या अपत्याच्या जन्मामुळे. ब्लूमबर्गच्या हवाल्याने 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. शिवॉन झिलिस यांच्यापासून मस्क यांना झालेलं हे तिसरं अपत्य असून, त्यांच्या एकूण अपत्यांची संख्या १२ झाली आहे. हे अपत्य मुलगा आहे की मुलगी आणि त्याचं नाव काय, याबद्दल अद्याप काहीही जाहीर करण्यात आलेलं नाही.
न्यूरालिंक ही मस्क यांची ब्रेन इम्प्लांट कंपनी अर्थात मेंदू प्रत्यारोपण क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी आहे. त्या कंपनीच्या स्पेशल प्रोजेक्ट्स विभागाच्या संचालिका शिवॉन झिलिस यांच्यापासून मस्क यांना हे अपत्य झालं आहे. शिवॉन झिलिस यांच्यापासून मस्क यांना 2021 साली जुळी अपत्यं झाली होती. त्यानंतर हे तिसरं अपत्य आहे.
अचानक ही बातमी आल्याने अनेकांना धक्का बसला आहे; मात्र हे सिक्रेट नव्हतं. कारण कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींना याबद्दल माहिती होती, असं मस्क यांनी म्हटलं आहे. याबद्दल प्रेस रिलीज जारी करणं म्हणजे विचित्र ठरलं असतं, असंही त्यांनी म्हटलं आहे; मात्र प्रेस रिलीज जारी न करणं म्हणजे हे सिक्रेट होतं असा त्याचा अर्थ नाही.
advertisement
ब्लूमबर्गने शुक्रवारीच एक लेख प्रसिद्ध केला होता. मस्क यांना अधिकाधिक मुलं हवी आहेत, अशा आशयाचं त्या लेखाचं शीर्षक होतं. त्यातूनच त्यांच्या या अपत्याची बातमी जाहीर झाली. लोकसंख्येच्या स्थिरतेसाठी जन्मदर 2.1 असला पाहिजे, असं मस्क यांचं म्हणणं आहे. आपल्या या दृष्टिकोनाचं मस्क नेहमी समर्थन करतात. सध्या जग या दरापेक्षाही खालच्या दिशेने चाललं आहे, असं मस्क म्हणतात. अनेक देश सध्या लोकसंख्येच्या बाबतीत रिप्लेसमेंट रेटच्याही खाली आले असून, जागतिक ट्रेंड असं सांगतो की यात आणखीही घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
म्युझिशियन ग्रिम्स यांच्यापासूनही मस्क यांना तीन मुलं आहेत. त्यांमध्ये 2021च्या अखेरीला सरोगेट माध्यमातून झालेल्या एका मुलीचाही समावेश आहे. सध्या ग्रिम्स यांनी मुलांचा ताबा हवा असल्याच्या कारणावरून मस्क यांच्यावर खटला दाखल केला असल्याचं समजतं. लोकसंख्यावाढ ही जगापुढची एक मोठी समस्या असताना मस्क सातत्याने आपलं मत ठामपणे मांडत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 25, 2024 11:33 PM IST