Google Maps चा योग्य वापर कसा करायचा? आजही अनेकांना नाही माहित; निळा, हिरवा, पिवळा 'कलर कोड' समजून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
चला तर मग, हे रंग काय सांगतात ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे पुढच्यावेळी तुम्हाला गुगल मॅप रिड करणं सोपं होईल.
मुंबई : हल्ली प्रत्येकजण गुगल मॅप वापरतोच. आपल्याला कुठल्याही नवीन ठिकाणी जायचं असलं की लोक त्याचा मार्ग आणि पर्याय शोधण्यासाठी लोक गुगल मॅप वापरतात. पण काही वेळा, लोकेशन शोधल्यानंतरही आपण चुकीच्या रस्त्याने जातो, कारण मॅपवर दिसणाऱ्या रेषा आणि रंगांचा अर्थ सगळ्यांना माहीत नसतो.
Google Maps वर तुम्हाला निळ्या, लाल, पिवळ्या, हिरव्या अशा अनेक रंगांच्या रेषा दिसतात. या सगळ्या रेषा आणि रंगांचा एक विशिष्ट अर्थ असतो, हे रंग कधी ट्रॅफिक दाखवतात, कधी रस्ता, कधी जंगल किंवा पाणी. चला तर मग, हे रंग काय सांगतात ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे पुढच्यावेळी तुम्हाला गुगल मॅप रिड करणं सोपं होईल.
advertisement
निळा (Blue) रंग काय सांगतो?
निळा रंग म्हणजे तुम्ही ज्या रस्त्यावर जाणार आहात तो रस्ता.
गडद निळा असेल, तर ट्रॅफिक नाही – तुम्ही आरामात पोहोचू शकता.
हलकासा निळा रंग म्हणजे पाण्याचं स्थान – नदी, तलाव, समुद्र वगैरे तिथे आहे.
लाल (Red) रंगाचं लक्ष द्या
लाल रंग म्हणजे ट्रॅफिक जाम
जर रस्ता लाल दिसत असेल, तर तिथे गाड्यांची खूप गर्दी आहे.
advertisement
खूप गडद लाल असेल, तर तिथे रस्ता जाम असू शकतो, त्यामुळे दुसरा पर्याय पाहा.
हिरवा (Green) म्हणजे काय?
हिरवा रंग जंगल, गार्डन, नॅशनल पार्क किंवा हिरवळ असलेल्या ठिकाणांसाठी असतो.
काही वेळा याचा अर्थ ट्रॅफिक नाही आणि रस्ता मोकळा आहे असाही असतो.
काळा (Black) आणि राखाडी (Gray) रंग म्हणजे काय?
हे रंग बंद रस्त्यांचा किंवा अपघात झालेल्या ठिकाणाचा इशारा करतात.
advertisement
तिथून रस्ता बंद असू शकतो, किंवा खूप ट्रॅफिकमुळे वाट मिळत नसेल.
पिवळा (Yellow) रंग काय सांगतो?
पिवळा रंग म्हणजे मुख्य रस्ता, मोठा रोड जिथून ट्रॅफिक मध्यम असतो.
फार गर्दी नाही, पण अगदी मोकळाही नाही, त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो.
आता Google Maps कसं वापरायचं हे समजून घेऊ?
कोणत्याही ठिकाणी तुम्हाला लवकर पोहोचायचं आहे? तर ब्लू किंवा ग्रीन रंग असलेला रस्ता निवडा.
advertisement
पिवळ्या रंगाच्या रस्त्यावर थोडा ट्रॅफिक असतो, पण बऱ्याचदा मॅनेजेबल असतो.
लाल आणि काळ्या रंगाच्या रस्त्यांपासून शक्यतो टाळा, हे रस्ते खूपच गर्दीचे असू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 11, 2025 9:31 AM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Google Maps चा योग्य वापर कसा करायचा? आजही अनेकांना नाही माहित; निळा, हिरवा, पिवळा 'कलर कोड' समजून घ्या








