या जुगाडने फ्रीमध्ये मिळेल Netflix! महागडं सब्सक्रिप्शन घेण्याची गरजच नाही
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Free Netflix: तुम्हालाही वाटत असेल की, तुम्ही नेटफ्लिक्सचा आनंद घ्यावा आणि यासाठी तुम्हाला एक रुपयाची द्यावा लागू नये तर आपण काही खास जुगाड जाणून घेणार आहोत.
मुंबई : OTT चे युग आल्यापासून लोकांनी टीव्ही पाहणे खूप कमी केले आहे. बहुतेक लोक आता त्यांच्या फोनवर त्यांचे आवडते चित्रपट, टीव्ही शो, वेब सिरीजचा आनंद घेतात. Netflix, Amazon Prime, SonyLiv, Disney+ Hotstar सारखे सर्व OTT प्लॅटफॉर्म मंथली आणि वार्षिक योजनांद्वारे त्यांच्या ग्राहकांकडून मोठी रक्कम आकारतात. अनेक वेळा असे घडते की, महागड्या किमतीमुळे काही लोक इंटरनेटवरून चित्रपट किंवा कोणतीही वेब सीरिज डाउनलोड करण्याचा जुगाड शोधतात. काही लोकांना नेटफ्लिक्स सीरीज खूप आवडतात, परंतु ते ते सब्सक्रिप्शन घेऊ शकत नाहीत.
पण आम्ही तुम्हाला अशा पद्धतीबद्दल सांगत आहोत ज्याद्वारे तुम्हाला नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. खरंतर आम्ही ज्या पद्धतीबद्दल सांगत आहोत ती म्हणजे रिचार्ज प्लॅन आहे. जिओ आणि एअरटेल त्यांच्या ग्राहकांसाठी अशा काही योजना ऑफर करतात, ज्याद्वारे तुम्ही नेटफ्लिक्सचा लाभ मोफत मिळवू शकता.
advertisement
Airtel Rs 1,199 पोस्टपेड प्लॅन:- या मंथली प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळेल. तसेच, डेटाच्या बाबतीत, कंपनी या प्लॅनसह 150GB डेटाचा लाभ देऊ शकते. विशेष बाब म्हणजे नेटफ्लिक्स बेसिक, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने + हॉटस्टार सब्सक्रिप्शनचा फायदा प्लॅनसोबत दिला जातो.
Airtel Rs 1,499 पोस्टपेड प्लॅन: या प्लॅनमध्ये ग्राहकांना 200GB डेटा मिळतो. याशिवाय दररोज 100 एसएमएसचाही फायदा आहे. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये यूजर्सना Netflix Basic, Amazon Prime, Disney + Hotstar च्या सबस्क्रिप्शनचा फायदाही दिला जातो. यामध्ये युजर्सना अनलिमिटेड 5G डेटाचा लाभही दिला जाईल.
advertisement
Reliance Jio चा 699 रुपयांचा प्लॅन:- रिलायन्स जिओचा 699 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग, 100GB डेटा, 3 अॅडिशनल सिम कनेक्शन, Netflix Basic सबस्क्रिप्शन, अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप आणि अॅडिशनल 5GB डेटा देखील अॅडिशनल सिम असलेल्यांसाठी उपलब्ध असेल.
advertisement
Reliance Jio Rs 1,499 पोस्टपेड प्लॅन:- Reliance Jio चा Rs 1,499 पोस्टपेड प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग, 300GB डेटा, 100 SMS डेली, 500GB पर्यंत डेटा रोलओव्हर ऑफर करतो. याशिवाय नेटफ्लिक्स (मोबाईल) आणि अॅमेझॉन प्राइम मेंबरशिपचा लाभही प्लॅनमध्ये देण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 04, 2023 12:02 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
या जुगाडने फ्रीमध्ये मिळेल Netflix! महागडं सब्सक्रिप्शन घेण्याची गरजच नाही








