Amazon-Flipkart वरून घेतलेले सामान असली आहे का नकली? ओळखण्यासाठी वापरा खास ट्रिक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधीकधी ई-कॉमर्स साइटकडून लोकांची फसवणूक केली जात आहे. यासंबंधीत अनेक प्रकरणं तुम्ही सोशल मीडियावर देखील पाहिलं असेल.
मुंबई : हल्ली ऑनलाइन वस्तु घरी मागवण्याचा ट्रेंड खूपच वाढला आहे. लोक वेगवेगळ्या ई-कॉमर्स साइटवरुन आपल्याला आवडणाऱ्या आणि खाशाला परवडणाऱ्या वस्तू घरी मागवत आहेत. ई-कॉमर्स साइट्समुळे लोकांचं आयुष्य खुपच सोपं झालं आहे. यामुळे लोकांचा वेळ वाचतो, शिवाय त्यासाठी कुठेही जाण्याची गरज भासत नाही.
पण या गोष्टीचा फायदा घेत कधीकधी ई-कॉमर्स साइटकडून लोकांची फसवणूक केली जात आहे. यासंबंधीत अनेक प्रकरणं तुम्ही सोशल मीडियावर देखील पाहिलं असेल.
दिल्लीतील मोठ्या ई-कॉमर्स वितरकांवर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने नुकतीच मोठी छापेमारी केली. या कारवाईत हजारो निकृष्ट दर्जाचे उत्पादन जप्त करण्यात आले. 19 मार्च रोजी तब्बल 15 तास चाललेल्या या कारवाईत BIS च्या टीमने अमेझॉन सेलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मोहन को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल एरिया, दिल्ली येथील गोदामातून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स जप्त केले.
advertisement
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या माहितीनुसार, या कारवाईत 3,500 हून अधिक प्रोडक्ट जप्त करण्यात आले. यात गीजर, फूड मिक्सर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे होती. तपासात आढळले की या प्रोडक्ट्सवर अनिवार्य असलेले ISI मार्क नव्हते किंवा काहींवर बनावट ISI मार्क लावले होते. या जप्त प्रोडक्ट्सची एकूण किंमत सुमारे 70 लाख रुपये असल्याचे समजते.
advertisement
त्यामुळे आता प्रश्न उपस्थीत झाला आहे की या ई-कॉमर्स साइट्स जे प्रोडक्ट आपल्या घरी पाठवत आहेत ते खरे आहेत की बनावट हे कसं कळेल? आपली फसवणूक झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर काळजी करु नका, BIS चे डिप्टी डायरेक्टर हरमोहनजीत सिंग पसरीचा यांनी यावर उपाय सांगितला आहे.
BIS Care App चा वापर करा:
Google Play Store किंवा Apple App Store वरून BIS Care App डाउनलोड करा.
advertisement
प्रोडक्टवर दिलेला ISI नंबर एंटर करा.
जर प्रोडक्टची डिटेल्स समोर आल्या तर प्रोडक्ट खरं आहे.
जर काहीही माहिती दिसली नाही, तर तो प्रोडक्ट बनावट असण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन खरेदी करताना ही खबरदारी घ्या:
Amazon Fulfilled किंवा Flipkart Assured टॅग असलेले प्रोडक्ट खरेदी करा.
स्वस्त किंमतीच्या गोष्टींना बळी पडू नका.युनिकोड QR कोड किंवा BIS सर्टिफिकेशन तपासा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2025 10:06 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Amazon-Flipkart वरून घेतलेले सामान असली आहे का नकली? ओळखण्यासाठी वापरा खास ट्रिक








