Car Windows Fog in Rain : फॉगमुळे दिसत नाहीये रस्ता? पावसाळ्यासाठी 'ही' सोपी युक्ती आणि झटक्यात प्रॉबलम सॉल्व
- Published by:Devika Shinde
Last Updated:
How do I stop my car from fogging in rain : आधी पावसाळ्यात ड्रायव्हिंग करताना विंडशील्डवर फॉग का जमतो हे समजून घेऊ
मुंबई : हल्ली पावसाळ्याचे दिवस आहेत. अशात कार किंवा फोर व्हिलर प्रवासाठी बरी वाटते, कारण यामुळे आपल्याला पाहिजे तिकडे End to End प्रवास करता येतो, ते ही पावसात न भिजता. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात लोक बहुतांश वेळा कारने प्रवास करतात. पण अनेकांना या काळात एक समस्या भेडसावते ती म्हणजे कारच्या विंडशील्डवर आणि डोअर ग्लासवर बसणारा फॉग.
या फॉगमुळे काचेतून बाहेर धुरकट दिसतं, ज्याला आपण ब्लर दिसणं देखील म्हणतो. कारचं वायपर सुरु असलं तरी देखील समोरील विंडशील्डवर हा फॉग कायमच असतो. अशावेळी भर पावसात अनेक लोक ड्रायविंग करायला कचरतात. पण घाबरु नका हे सगळयांसोबत होतं, पण सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी काही सोपे उपाय तुमच्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत. ज्याचा वापर करुन तुम्ही हा प्रश्न कायमचा सोडवू शकता.
advertisement
आधी पावसाळ्यात ड्रायव्हिंग करताना विंडशील्डवर फॉग का जमतो हे समजून घेऊ?
जेव्हा गाडीत आतल्या बाजूला हवा गरम हवा असते आणि बाहेर थंड हवामान असतं, तेव्हा तापमानाच्या फरकामुळे काचेवर असा फॉग तयार होतो.
पावसाळ्यात ही समस्या सोडवण्यासाठी काय कराल? (How do I stop my car from fogging in rain )
1. वायपर ब्लेड्स तपासा
तुमच्या कारचे वायपर ब्लेड्स तीव्र आणि कार्यक्षम असायला हवेत. बोथट झालेल्या वायपरमुळे पावसाचं पाणी व्यवस्थित पुसलं जात नाही आणि दृश्यता कमी होते. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यापूर्वी ब्लेड्स तपासून घ्या, गरज असल्याच ते बदला.
advertisement
2. HVC किंवा क्लायमेट कंट्रोल वापरा
कारच्या विंडशील्डच्या खाली वेंट्स असतात. कार चालू करताना HVC (हिटिंग, व्हेंटिलेशन, क्लायमेट कंट्रोल) सिस्टीम ऑन करा आणि विंडशील्डवर थेट हवा सोडणारा पर्याय निवडा. त्यामुळे काचांवर साचलेला फॉग काही सेकंदांतच नाहीसा होतो.
3. काचांवर अँटी-फॉग सोल्यूशन लावा
बाजारात मिळणारे अँटी-फॉग स्प्रे किंवा जेल वापरल्याने देखील हा फॉग जमा होत नाही आणि काच स्वच्छ राहते.
advertisement
पावसात कार चालवताना फॉग ही सामान्य समस्या असली तरी दुर्लक्ष केल्यास ती घातक ठरू शकते. वर दिलेले उपाय अमलात आणल्यास तुम्ही सुरक्षित आणि स्पष्ट ड्रायव्हिंगचा अनुभव घेऊ शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 02, 2025 7:55 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Car Windows Fog in Rain : फॉगमुळे दिसत नाहीये रस्ता? पावसाळ्यासाठी 'ही' सोपी युक्ती आणि झटक्यात प्रॉबलम सॉल्व