Dombivli Crime News : डोंबिवलीतील बॅट दुकानात संध्याकाळी घडला थरार;अख्ख मार्केट दहशतीत

Last Updated:

Dombivli Shocking News : डोंबिवलीत बॅटचे पैसे मागितल्यावर दुकानदारावर दोन पुरुषांनी लाकडी आणि प्लास्टिकच्या बॅटने मारहाण केली. रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

News18
News18
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. स्थानिक रहिवासी जिग्नेश छेड़ा हा दुकानदार आपल्या दुकानात होता तेव्हा बाबू आणि त्याचा मित्र या दोघांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला.
बॅटच्या वादामुळे मार्केटमध्ये घडली थरारक घटना
सदर घटनेत आरोपींनी जिग्नेशवर लाकडी आणि प्लास्टिकच्या बॅटने वार केले. मारहाण झाल्यानंतर दुकानदार गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
मारहाणीचे नेमके कारण काय?
पोलीसांनी सांगितलेल्या माहितीनुसार मारहाण ही बॅटचे पैसे मागितल्यावर झालेल्या वादातून घडली होती. दरम्यान परिसरातील दुकानात असलेले लोक, ग्राहक आणि आसपासच्या रहिवाशांनी ही घटना पाहून पोलिसांना त्वरित माहिती दिली ज्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला गेला.
advertisement
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपींना ताब्यात घेण्यासाठी तपास सुरू आहे आणि लवकरच त्यांना अटक केली जाईल. पोलीसांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आणि अनावश्यक वाद टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, दुकानदार आणि रहिवाशांना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अधिक सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli Crime News : डोंबिवलीतील बॅट दुकानात संध्याकाळी घडला थरार;अख्ख मार्केट दहशतीत
Next Article
advertisement
BJP vs Shiv Sena Ambernath : भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, गेमच फिरला अंबरनाथमध्ये उलथापाल
  • अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

  • शिवसेना शिंदे गटाची अंबरनाथमधून सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जंग पछाडलं.

  • शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजप पुरता घायाळ

View All
advertisement