सोनं महाग झालंय पण iPhone मिळतोय स्वस्तात! पाडवा-भाऊबीजेच्या गिफ्टचं टेन्शनच मिटलं; बायको, बहीण दोघीही खूश
- Published by:Priya Lad
Last Updated:
iPhone Diwali Offer : सोन्याच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पण तरी तुम्हाला बायको आणि बहिणीला काही मौल्यवान गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही आयफोन देऊ शकता. कारण आयफोन आता स्वस्तात मिळतो आहे.
नवी दिल्ली : दिवाळी म्हणजे पाडवा आणि भाऊबीज, पत्नी आणि बहीण दोघांनाही काय गिफ्ट द्यायचं हे टेन्शन कित्येक पती आणि भावांसमोर असतं. सामान्यपणे महिलांना काही गिफ्ट द्यायचं म्हणजे सोन्याचे दागिने. पहिल्या पाडव्याला तर पतीने पत्नीला सोनंच द्यायचं असं म्हणतात. पण सोन्याच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पण तरी तुम्हाला बायको आणि बहिणीला काही मौल्यवान गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही आयफोन देऊ शकता. कारण आयफोन आता स्वस्तात मिळतो आहे.
दिवाळी म्हणजे सेल... याच सेलमध्ये तुम्हाला आयफोनही कमी किमतीत मिळतो आहे. अॅपलचा आयफोन 16 सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे. आयफोन 16 ज्याच्या बेसिक मॉडेलची किमत 79900 रुपये आहे. जी आता खूपच कमी झाली आहे. किंमतीत लक्षणीय घट झाल्याने युझर्सचा उत्साह आणखी वाढला आहे.
advertisement
आयफोन 16 दिवाळी सेल दरम्यान 13410 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तो फक्त 66490 रुपयात उपलब्ध आहे. जर तुम्ही IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड वापरून EMI केला तर 5% म्हणजे तब्बल 10000 रुपयांपर्यंत लगेच सूट मिळेल. या ऑफरनंतर आयफोन 16 फक्त ₹56,490 रुपयांना मिळेल. म्हणजे 66490 रुपयांचा आयफोन तुम्हाला तब्बल 23,410 रुपयांनी स्वस्तात मिळेल. इतक्या पैशांची बचत हईल. तुमच्यासाठी एक्सचेंज ऑफरदेखील देत आहे. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर तुम्ही किंमत आणखी कमी करण्यासाठी तो एक्सचेंज करू शकता.
advertisement
आता इतक्या स्वस्तात आयफोन 16 कुठे मिळतोय हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर ही ऑफर आहे विजय सेल्सवर. विजय सेल्सने दिवाळी सेल 2025 लाँच केला आहे. ज्यामध्ये आयफोन इतक्या स्वस्तात मिळत आहे.
आयफोन 16 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
6.1 इंचचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे जो 2000 निट्स पर्यंतची कमाल ब्राइटनेस देतो.
advertisement
25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 3561 एमएएच बॅटरी आहे.
हा फोन A18 चिपसेटद्वारे समर्थित आहे, जो Apple Intelligence सपोर्टसह येतो. हे डिव्हाइस iOS 18 वर चालते आणि बेस व्हेरिएंटमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह येते.
iPhone 16 पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. अल्ट्रामरीन, टील, काळा, पांढरा आणि गुलाबी.
advertisement
48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि फेसटाइमसाठी उत्कृष्ट परिणाम देतो.
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 18, 2025 1:15 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
सोनं महाग झालंय पण iPhone मिळतोय स्वस्तात! पाडवा-भाऊबीजेच्या गिफ्टचं टेन्शनच मिटलं; बायको, बहीण दोघीही खूश