iPhone Security Threat: तातडीने iphoneची सिक्युरिटी अपडेट करा, Appleने कबूल केली गंभीर चूक; दुर्लक्ष केल्यास फोन होईल बर्बाद

Last Updated:

iPhone Security Risk: ॲपलने iPhone युझर्ससाठी तातडीचे iOS 18.6.2 सुरक्षा अपडेट जारी केले आहे. कंपनीने संभाव्य हॅकिंगपासून बचावासाठी सर्व युझर्सना लगेच अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.

News18
News18
मुंबई: ॲपलने आयफोन युझर्ससाठी तातडीचे सिक्युरिटी अपडेट जारी केले आहे. कंपनीने iphone डिव्हाइसना हे नवीन व्हर्जन लगेच इन्स्टॉल करण्याचे आवाहन केले आहे. iOS 18.6.2 हे अपडेट ॲपलला सक्तीने जारी करावे लागले आहे. कारण कंपनीला डिव्हाइसवर गंभीर सुरक्षेचे धोके आढळले आहेत.
iOS 18.6.2 अपडेट का महत्वाचे?
नवीन iOS 18.6 अपडेटबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. याबाबत ॲपलने दिलेल्या माहितीनुसार काही एक्सप्लॉइट्स आधीच अनेक आयफोन युझर्सना प्रभावित करू शकतात. कंपनीने अत्यंत Advance Attack झाल्याचा उल्लेख केला आहे. ज्यात निवडक युझर्सना लक्ष्य केले गेले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ॲपलने दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे. जेव्हा ॲपल स्वतः संभाव्य धोकादायक एक्सप्लॉइट्सबद्दल इशारा देतो. तेव्हा वापरकर्त्यांनी त्वरित लक्ष देऊन सुचवलेले अपडेट करणे गरजेचे ठरते.
advertisement
सुरक्षा धोक्याचे स्वरूप
या हल्ल्याचे मूळ कारण म्हणजे Malicious इमेज फाईल्स होय. ज्या प्रोसेस केल्यावर डिव्हाइसची मेमरी करप्ट होऊ शकते. ॲपलला या बगचा Sophisticated Attacks झाल्याचेही रिपोर्ट्स मिळाले आहेत.
कोणते मॉडेल्स अपडेट करावे लागणार?
iOS 18.6.2 हे अपडेट जवळ जवळ सर्व iPhoneसाठी उपलब्ध आहे. iPhone Xs पासून ते iPhone 16 Pro Max पर्यंत सर्व मॉडेल्ससाठी हे अपडेट सक्तीचे आहे. जर तुम्ही या मॉडेल्सपैकी कोणतेही वापरत असाल तर तातडीने अपडेट करून हॅकिंगपासून डिव्हाइसचे सेफ करणे गरजेचे आहे.
advertisement
अपडेट करण्याची पद्धत:
-Settings मध्ये जा
-General वर क्लिक करा
-Software Update निवडा
-स्क्रीनवर नवीन iOS 18.6.2 अपडेट दिसेल
-पासकोड टाकून डाउनलोड Authenticate करा
-आयफोन रिबूट करून नवीन अपडेट इन्स्टॉल करा
नवीन फिचर्स – iOS 26 बीटा अपडेट
iOS 18.6.2 तातडीचा सुरक्षा अपडेट असला तरी ॲपल iOS 26 बीटा अपडेटवर काम करत आहे. या बीटाच्या फेज 4 मध्ये काही खास फिचर्स आहेत.
advertisement
-Adaptive Power Mode (AI फीचर असलेल्या मॉडेल्ससाठी बॅटरी सेटिंग्जमधील नवीन पर्याय)
-Liquid Design Intro Video (स्टार्टअपवेळी नवे व्हिज्युअल्स)
इतर अपडेट
ॲपलच्या म्हणण्यानुसार Adaptive Power Mode ही सुविधा केवळ iPhone 15 Pro किंवा त्यानंतरच्या मॉडेल्ससाठी उपलब्ध आहे. हा पर्याय छोट्या परफॉर्मन्स अॅडजस्टमेंट्स करून आयफोनची बॅटरी लाइफ वाढवतो.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
iPhone Security Threat: तातडीने iphoneची सिक्युरिटी अपडेट करा, Appleने कबूल केली गंभीर चूक; दुर्लक्ष केल्यास फोन होईल बर्बाद
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement