फक्त 1 रुपया जास्त देऊन मिळवा जास्त फायदा, Jio ची ग्राहकांसाठी खास ऑफर

Last Updated:

फक्त 1 रुपया जास्त देऊन Jio रिचार्ज प्लान घेतला तर त्यात काय फायदा मिळतो? चला जाणून घेऊ.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : आजकाल फक्त मोबाईल रिचार्ज पुरेसं नाही, ग्राहकांना इंटरनेट डेटा, कॉलिंगसोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजन हवे असते. हे लक्षात घेऊन Jio आपल्या युजर्ससाठी दरवेळी काहीतरी नवीन ऑफर करत असते. अलीकडेच जिओने दोन असे रिचार्ज प्लान्स सादर केले आहेत, जे केवळ कॉलिंग आणि डेटाच नाही तर Hotstar आणि Amazon Prime सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शनही देतात.
₹1028 चा Jio रिचार्ज प्लान
डेटा: एकूण 168GB (रोज 2GB डेटा)
व्हॅलिडिटी: 84 दिवस, यामध्ये अनलिमिटेड कॉल्स आहेत. शिवाय दररोज 100 SMS चा ही पर्याय उपलब्ध आहे.
याशिवाय 90 दिवसांसाठी JioCinema Premium (Hotstar) ही फ्री मिळणार आहे.
एवढच नाही तर Swiggy One Lite सब्सक्रिप्शन आणि ₹50 कॅशबॅक पर्याय आहे.
या सगळ्यात फक्त 1 रुपया जास्त देऊन ₹1029 चा Jio रिचार्ज प्लान घेतला तर त्यात काय फायदा मिळतो? चला जाणून घेऊ.
advertisement
₹1029 चा Jio रिचार्ज प्लान
त्यात रोज 2GB डेटा मिळतो. याची व्हॅलिडिटी 84 दिवस असते. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS रोज मिळतात.
90 दिवसांसाठी JioCinema Premium (Hotstar), Amazon Prime सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे.
फायदेशीर कोणता?
जर तुम्हाला ओटीटीवर वेळ घालवायला आवडत असेल, खासकरून Amazon Prime वर वेब सिरीज आणि मूव्हीज बघायला, तर ₹1029 चा प्लान जास्त फायदेशीर ठरू शकतो. फक्त ₹1 जास्त देऊन तुम्हाला Prime चे सब्सक्रिप्शन मिळते, जे अनेकजण स्वतंत्रपणे घेतातच.
advertisement
जिओचे हे प्लान्स खासकरून त्यांच्यासाठी उत्तम आहेत, जे फक्त मोबाईल वापरण्यापुरते न थांबता डिजिटल एंटरटेनमेंटचा पुरेपूर आनंद घेऊ इच्छितात.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
फक्त 1 रुपया जास्त देऊन मिळवा जास्त फायदा, Jio ची ग्राहकांसाठी खास ऑफर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement