Jio, Airtel आणि Vi च्या 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचे प्लॅन! जाणून घ्या काय मिळेल फ्री

Last Updated:

200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या Jio, Airtel आणि Vi प्लॅनमध्ये तुम्हाला कोणते फायदे मिळतील ते जाणून घ्या. तसेच प्लॅनची ​​व्हॅलिडिटी किती दिवसांची असेल ते देखील जाणून घ्या.

जिओ, एअरटेल व्हिआय
जिओ, एअरटेल व्हिआय
Jio Airtel And Vi Plans: जिओ, एअरटेल आणि व्हीआयच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लॅन उपलब्ध आहेत. 200 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या Jio, Airtel आणि Vi रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला कोणते फायदे मिळतात ते आम्ही तुम्हाला सांगतो.
जिओचा 189 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
डेटा: एकूण 2GB
कॉलिंग: अनलिमिटेड
SMS: एकूण 300
व्हॅलिडिटी: 28 दिवस
अतिरिक्त फायदे: JioTV सबस्क्रिप्शन आणि JioCloud
Airtelचा 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलच्या या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, हा प्लॅन पूर्ण 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. कंपनी या प्लॅनसह यूझर्सना एकूण 2GB डेटा देत आहे. याशिवाय, या प्लॅनसह यूझर्सना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळते. या योजनेत, यूझर्सना एकूण 300 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते.
advertisement
Vi चा 189 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
VI च्या या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, हा प्लॅन पूर्ण 26 दिवसांच्या व्हॅलिडिटी येतो. कंपनी या प्लॅनसह यूझर्सना एकूण 1 जीबी डेटा देत आहे. तसेच, या प्लॅनमध्ये यूझर्सना एकूण 300 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. याशिवाय, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, यूझर्सना या योजनेसह Vi Movies & TV सबस्क्रिप्शन मिळते.
advertisement
जिओचा 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
जिओचा 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 18 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह यूझर्ससाठी उपलब्ध आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये यूझर्सना दररोज 1.5GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस सर्व्हिस मिळते. याव्यतिरिक्त, यूझर्सना JioTV सबस्क्रिप्शन आणि JioCloud सर्व्हिस देखील मिळेल.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio, Airtel आणि Vi च्या 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचे प्लॅन! जाणून घ्या काय मिळेल फ्री
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement