रिचार्च प्लॅन होणार महाग! Jio-Airtel-Vi यूझर्सना बसणार धक्का, पहा कितीने वाढणार
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
या वर्षी मे महिन्यात अॅक्टिव्ह मोबाईल यूझर्सच्या संख्येत खूप चांगली वाढ दिसून आली. ज्यामुळे टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा त्यांचे प्लॅन महाग करण्याची तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत, पुन्हा एकदा त्याचा थेट परिणाम त्या ग्राहकांवर जास्त होईल.
मुंबई : गेल्या वर्षी, टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन महाग केले होते. परंतु आता ग्राहकांना पुन्हा एकदा धक्का बसणार आहे. मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा एकदा 12% महाग होऊ शकतात. खरं तर, या वर्षी मे महिन्यात, अॅक्टिव्ह मोबाईल यूझर्सच्या संख्येत खूप चांगली वाढ दिसून आली. ज्यामुळे टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा प्लॅन महाग करण्याची तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत, पुन्हा एकदा त्याचा थेट परिणाम त्या ग्राहकांवर होईल जे संपूर्ण वर्षभर रिचार्ज करतात किंवा मोठ्या पॅकवर. तज्ञांचा असा विश्वास आहे की किंमत वाढल्यानंतर, ग्राहक पुन्हा त्यांचा नंबर पोर्ट करू शकतात.
मे महिन्यात यूझर्स वाढले
या वर्षी मे महिन्यात 74 लाख अॅक्टिव्ह यूझर्स वाढले आहेत. ही खूप चांगली वाढ आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 29 महिन्यांच्या तुलनेत ही सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत, अॅक्टिव्ह यूझर्सची संख्या 108 कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 5 महिन्यांत यूझर्सची संख्या सातत्याने वाढत आहे.
advertisement
मीडिया रिपोर्ट्समधून असेही समोर आले आहे की या वर्षी मे महिन्यात वाढलेले यूझर्स महागडे रिचार्ज करणारे नव्हते. तर ते असे यूझर्स होते जे काही महत्त्वाच्या कामासाठी सिम वापरतात. अशा यूझर्सकडे अनेक सिम आहेत. ब्रोकरेज कंपनी जेफरीजच्या मते, यूझर्समध्ये वाढ झाल्यामुळे एअरटेल आणि जिओसारख्या कंपन्यांना मोबाइल रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवण्याची संधी मिळाली आहे. परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे व्हीआय यूझर्स सतत कमी होत आहेत, अशा परिस्थितीत एअरटेल आणि जिओला अधिक फायदा होईल.
advertisement
चांगल्या नेटवर्कची आवश्यकता
view commentsसुरुवातीला यूझर्सना जिओकडून खूप चांगले नेटवर्क मिळत असे. परंतु गेल्या काही दिवसांपासून नेटवर्क खूप खराब असल्याने यूझर्सना डेटा वापरण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय, एअरटेलची सेवा आता पूर्वीपेक्षा खूपच चांगली झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 07, 2025 4:35 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
रिचार्च प्लॅन होणार महाग! Jio-Airtel-Vi यूझर्सना बसणार धक्का, पहा कितीने वाढणार


