ChatGPT Down: चॅटजीपीटी अचानक बंद पडले, इतिहासातील सर्वात मोठे आउटेज; युझर्सनी पाहा काय केले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
ChatGPT च्या सेवेत जगभरात मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आल्याने युझर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे अनेकांनी यावर मिम्सचा पाऊस पाडला आहे. याआधीही ChatGPT मध्ये अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या असून, यामुळे कोट्यवधी युझर्सचे काम विस्कळीत झाले आहे.
मुंबई: ChatGPT युझर्सकडून जगभरात मोठ्या प्रमाणावर आउटेज (सेवा खंडित होणे) नोंदवला जात आहे. फक्त भारतातच 515 हून अधिक वापरकर्त्यांनी Downdetector वर तक्रारी नोंदवल्या आहेत. यावरून हा अडथळा जागतिक स्तरावर अनेकांना भेडसावत असल्याचे स्पष्ट होते.
गेल्या 30 मिनिटांत शेकडो वापरकर्त्यांनी AI चॅटबॉटसंदर्भात समस्या नोंदवल्या असल्याचे Downdetector या ऑनलाइन सेवा स्थिती तपासणाऱ्या वेबसाइटने सांगितले. काही वापरकर्ते आपल्या कामात खंड पडेल यामुळे चिंतेत होते. तर दुसरीकडे मोठ्या संख्येने लोकांनी मेम्स शेअर करत या अडथळ्याची खिल्ली उडवली. एका वापरकर्त्याने व्हिडिओ शेअर करून लिहिले – सगळेजण X वर धाव घेऊन बघतायत की ChatGPT खरंच डाऊन आहे का?
advertisement
याआधीही अशा घटना
OpenAI चा लोकप्रिय AI चॅटबॉट ChatGPT ने मागील काही महिन्यांत अनेकदा मोठे आउटेज अनुभवले आहेत. ज्यामुळे जगभरातील कोट्यवधी युझर्सचे काम विस्कळीत झाले. 12 डिसेंबर 2024 रोजी वापरकर्त्यांना अचानक एरर मेसेज दिसू लागले आणि सेवा ठप्प झाली. OpenAI ने ही अडचण मान्य करून त्वरीत सेवा पूर्ववत केली.
advertisement
फक्त दोन आठवड्यांनंतर 26 डिसेंबर 2024 रोजी, ChatGPT आणि त्याचे API पुन्हा ठप्प झाले. या जागतिक आउटेजसाठी कंपनीने अपस्ट्रीम प्रोव्हायडर ला जबाबदार ठरवले. ज्याचा संबंध Microsoft च्या इन्फ्रास्ट्रक्चरशी असल्याचे मानले जाते. काही तास सेवा ठप्प राहिल्यानंतर दुपारी 2:05 (PST) पासून टप्प्याटप्प्याने सेवा सुरू झाली.
advertisement
सर्वात मोठी घटना 10 जून 2025 रोजी घडली जेव्हा ChatGPT ला जवळपास 12 तासांचा जागतिक अडथळा सहन करावा लागला. या काळात भारत आणि अमेरिका सर्वाधिक प्रभावित झाले. या बिघाडाचे तपशीलवार तांत्रिक स्पष्टीकरण OpenAI ने अद्याप दिलेले नाही.
advertisement
या सततच्या आउटेजमुळे ChatGPT वर वैयक्तिक, व्यावसायिक आणि एंटरप्राईज वापरासाठी अवलंबून असलेल्या वापरकर्त्यांमध्ये आणि डेव्हलपरांमध्ये गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 3:35 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
ChatGPT Down: चॅटजीपीटी अचानक बंद पडले, इतिहासातील सर्वात मोठे आउटेज; युझर्सनी पाहा काय केले


