Microsoft ची ही सेवा बंद होणार; ios आणि Android दोन्ही वापर्त्याकर्त्यांच्या फोनमधून गायब होणार हे ऍप

Last Updated:

जगातील नामांकित टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने आपल्या लोकप्रिय Microsoft Lens ऍपला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोर्स ; सोशल मीडिया
सोर्स ; सोशल मीडिया
मुंबई : गरजेच्यावेळी मोबाईलवरून कागदपत्रे स्कॅन करणे ही एक सामान्य सवय झाली आहे. लोकांना आपले कागदपत्र कुठे पाठवायची झाली तर लोक अशा ऍपने ते स्कॅन करुन डिजिटल पाठवतात. अशातच, जगातील नामांकित टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने आपल्या लोकप्रिय Microsoft Lens ऍपला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मायक्रोसॉफ्टने जाहीर केले आहे की iOS आणि अँड्रॉइडसाठीचे हे ऍप 2025 च्या अखेरीस टप्प्याटप्प्याने बंद होणार आहे. प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 15 डिसेंबर 2025 रोजी समाप्त होईल. त्यानंतर वापरकर्ते नवीन स्कॅन तयार करू शकणार नाहीत.
हा निर्णय कंपनीने Windows 10 साठी सपोर्ट संपवण्याच्या (ऑक्टोबर 2025) काही आठवडे आधी घेतला आहे.
advertisement
2014 मध्ये Office Lens नावाने Windows Phone वर हे ऍप आणले होते. नंतर Microsoft Lens म्हणून ओळखले जाऊ लागले. हे Windows 10 पेक्षा एक वर्ष जुने असून, Apple App Store आणि Google Play Store वर सर्वाधिक रेटिंग मिळवलेल्या मोफत ऍप्सपैकी एक आहे.
कंपनीच्या वेळापत्रकानुसार, 15 डिसेंबर 2025 नंतर वापरकर्ते जुन्या स्कॅन्स पाहू शकतील, पण ऍपचे अपडेट्स किंवा सपोर्ट मिळणार नाही.
advertisement
मायक्रोसॉफ्टने पुढील स्कॅनिंगसाठी Microsoft 365 Copilot ऍपमधील ‘Scan’ फीचर वापरण्याची शिफारस केली आहे. या फीचरद्वारे टेक्स्ट थेट Word मध्ये, टेबल्स Excel मध्ये स्कॅन करण्याची सुविधा मिळेल. फाइल्स OneDrive मध्ये सेव्ह होऊन Copilot ऍपच्या ‘MyCreations’ सेक्शनमध्ये दिसतील.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Microsoft ची ही सेवा बंद होणार; ios आणि Android दोन्ही वापर्त्याकर्त्यांच्या फोनमधून गायब होणार हे ऍप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement