iOS 17 अपडेटनंतर जुन्या आयफोन्सच्या बॅटरीज झपाट्याने उतरतायं, काय आहे कारण?
- Published by:News18 Digital
- trending desk
Last Updated:
' कालपर्यंत जी बॅटरी मला दिवसभर पुरत होती, ती आता सकाळी 10 वाजताच पुन्हा चार्ज करावी लागते.'
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : अॅपल कंपनीने याच आठवड्यात बहुप्रतीक्षित आयओएस 17 अपडेट प्रसारित केला. त्याद्वारे कम्पॅटिबल आयफोन्ससाठी काही नवी फीचर्स सादर झाली आहेत. कॉलिंग, मेसेजिंग, फेसटाइम, एअरड्रॉप या सगळ्यामध्ये आणि आणखी अनेक बाबींमध्ये या अपडेटमुळे सुधारणा झाली असून, युझर इंटरफेस कायम राखण्यात आला आहे.
मात्र आयओएस 17 सादर करण्यात आल्यानंतर आठवड्याभरातच युझर्सकडून बॅटरी परफॉर्मन्सबद्दल तक्रारी केल्या जाऊ लागल्या आहेत. एक्स (ट्विटर) या सोशल मीडियावर युझर्स त्याबद्दल व्यक्त होत आहेत. ही समस्या खासकरून जुन्या आयफोन्सच्या बाबतीत जाणवत असून, त्यात फारसं काही आश्चर्य नाही असं सांगितलं जात आहे. कारण ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मोठं अपग्रेडेशन झालं, तर अधिक प्रोसेसिंग पॉवर आणि स्टोरेजची गरज असते. अॅपलच्या सपोर्ट पेजवरही आयओएस 17मुळे बॅटरी लाइफ कमी होत असल्याच्या तक्रारी दिसत आहेत. त्यामुळे कंपनीला नजीकच्या भविष्यकाळात आयओएस 17.1 व्हर्जनसह कंपनीला सध्याच्या समस्येवर उत्तर काढावं लागणार असल्याचं दिसत आहे.
advertisement
'माझ्या आयफोन 14ची बॅटरी अचानक खूप उतरू लागली आहे,' असं एका युझरने म्हटलं आहे. दुसऱ्या एका युझरने म्हटलं आहे, की 'नवे आयफोन 15 बाजारात सादर झाले आहेत, याची मला कल्पना आहे; पण आधीच्या आयफोनच्या बॅटरी लाइफशी सुरू असलेला खेळ थांबवा. काहीही वापर नसताना 10 मिनिटांत बॅटरी 10 टक्क्यांवर कशी काय येऊ शकते?'
advertisement
आणखी एका युझरने म्हटलं आहे, की 'काल रात्री मी माझ्या आयफोनमध्ये आयओएस 17चा अपडेट केला आणि आता माझ्या फोनची बॅटरी उतरू लागली आहे. कालपर्यंत जी बॅटरी मला दिवसभर पुरत होती, ती आता सकाळी 10 वाजताच पुन्हा चार्ज करावी लागते.'
advertisement
तंत्रज्ञान विषयातला लोकप्रिय यू-ट्यूबर मार्क्विस ब्राउनली याने अलीकडेच इन्स्टाग्राम रीलच्या माध्यमातून या समस्येवर प्रकाश टाकला होता. 'फोनच्या बॅटरीजची क्षमता काळानुसार नैसर्गिकरीत्या कमी होत जाते. त्यामुळे युसेज कपॅसिटी कमी होत जाते. आयफोन्सची पॉवर अचानक कमी होऊ नये, यासाठी अॅपल कंपनीने सीपीयू फ्रिक्वेन्सी अंडरलॉक केली आहे. तरीही युझर्सना बॅटरीशी निगडित समस्या येत असल्या, तर ते 'पीक परफॉर्मन्स कॅपॅबिलिटी' हा पर्याय सुरू करू शकतात. त्याद्वारे आयफोनचं परफॉर्मन्स मॅनेजमेंट करता येतं.'
advertisement
याचा अर्थ असा आहे, की आयओएसकडून सीपीयू, जीपीयू आणि अन्य घटकांची सर्वोत्तम कामगिरी डायनॅमिकली नियंत्रित केली जाते, जेणेकरून बॅटरी पुरवू शकते त्यापेक्षा जास्त पॉवर त्यांच्याकडून वापरली जाण्याला प्रतिबंध केला जाईल. एकंदरीत पाहता, आयफोन्स अनपेक्षितरीत्या शटडाउन होणार नाहीत; मात्र काही परिस्थितीत ते अधिक संथ चालू शकतात.
ब्राउनलीने हेही स्पष्ट केलं, की ही समस्या सॉफ्टवेअर अपडेटशी निगडित नाही. कारण हे फीचर सिस्टीममध्ये इनबिल्ट असतं आणि अपडेट्सचा त्यावर परिणाम होत नाही.
advertisement
हे सगळं असलं तरीही जुन्या आयफोन युझर्सना येत असलेल्या समस्येसाठी नेमकं काय कारणीभूत आहे, याबद्दल अद्याप नेमकं काही कळलेलं नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2023 4:50 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
iOS 17 अपडेटनंतर जुन्या आयफोन्सच्या बॅटरीज झपाट्याने उतरतायं, काय आहे कारण?