नवीन फोन घेताच ऑन करा या 3 सेटिंग! डेटा लिक होण्याचं टेन्शनच नाही

Last Updated:

तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी केला असेल आणि सेटअपपूर्वी डेटा लीक होण्याची भीती वाटत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. डेटा ट्रान्सफर, नवीन अॅप्लिकेशन्स इंस्टॉल आणि सिस्टम अपडेट्सचे संपूर्ण डिटेल्स येथे दिले आहेत. तुम्ही तुमच्या फोनमध्ये या सेटिंग्ज कराव्यात, त्यानंतर डेटा लीक होण्याची शक्यता नाहीशी होईल.

टेक्नॉलॉजी न्यूज
टेक्नॉलॉजी न्यूज
मुंबई : तुम्ही नवीन फोन खरेदी करता तेव्हा त्यामध्ये तुम्ही जुन्या फोनचा डेटा टाकता. पण डेटा ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेत नेहमीच एक टेंशन असते की डेटा लीक तर नाही होणार? या प्रक्रियेमध्ये थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्सची मदत घेतली जाते ज्यामध्ये नेहमी डेटा लीक होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला अशा 3 सेटिंग्जबद्दल सांगणार आहोत ज्या फॉलो करून डेटा लीक होण्याची शक्यता कमी होते. यामुळे तुमचा पर्सनल डेटा सुरक्षित राहतो आणि तुमचे कामही पूर्ण होते.
यामध्ये फाईल्स, फोटो, व्हिडीओ शेअर करणे आणि नवीन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करणे आणि नवीन फोनमधील सिस्टम अपडेट करण्याआधीच्या सेटिंग्ज स्पष्ट केल्या आहेत. या सेटिंग्ज आधीच करा जेणेकरून तुम्ही डेटा लीकचा ताण टाळू शकता.
या तीन सेटिंग्ज आवश्यक आहेत
यासाठी, जेव्हाही तुम्ही कोणतीही फाईल, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करता किंवा रिसिव्ह करता तेव्हा तुम्हाला क्विक शेअरवर जावे लागेल. त्यात बाय डिफॉल्ट कॉन्टॅक्ट सिलेक्ट होतात. ते काढून टाका आणि योर डिव्हाइसचा ऑप्शन निवडा. तुम्हाला कोणतीही फाईल मिळवायची असेल तर एव्हरीवन वर टिक करा.
advertisement
नवीन फोनमध्ये ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी सेटिंग्ज करा
आता जर तुम्ही नवीन फोन घेतला असेल तर त्यालाही ॲप्सची आवश्यकता असेल. त्यामुळे नवीन ॲप्स इन्स्टॉल करण्यापूर्वी सेटिंग्जमध्ये जा. सेटिंग्जमध्ये, सर्च बारमध्ये Unknown टाइप करून सर्च करा, Unknown वर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि Install Unknown Apps वर जा. येथे तुम्हाला सूचीमध्ये Chrome, Drive, Files, Gmail आणि WhatsApp दिसतील, या सर्वांना नॉट अलाउड करा.
advertisement
टाइम टू टाइम सिस्टम अपडटे करा
वर सांगितलेल्या स्टेप्स नंतर तुमचा फोन सेटअप होईल. शेवटी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन अपडेट टाइप करून सर्च करावे लागेल. तुमच्या समोर सिस्टम अपडेटचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. यामुळे सिस्टीम वेळोवेळी अपडेट होत राहील.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
नवीन फोन घेताच ऑन करा या 3 सेटिंग! डेटा लिक होण्याचं टेन्शनच नाही
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement