Phone Hack : फोनमध्ये दिसायला लागले हे संकेत, तर समजून जा... तुमचा फोन हॅक झालाय!
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
सोशल मीडिया अकाउंट किंवा फोन हॅक झाल्याच्या बातम्या अनेकदा आपल्या कानावर पडतात; पण हॅकर्स हे हॅकिंग नेमकं कसं करतात, हे माहिती आहे का?
मुंबई, 14 डिसेंबर : सोशल मीडिया अकाउंट किंवा फोन हॅक झाल्याच्या बातम्या अनेकदा आपल्या कानावर पडतात; पण हॅकर्स हे हॅकिंग नेमकं कसं करतात, हे माहिती आहे का? हॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती, फोन हॅक झाल्याचे संकेत व हॅकिंगपासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं, याबद्दल जाणून घेणार आहोत.
हॅकिंग सॉफ्टवेअर
सॉफ्टवेअरच्या मदतीने फोन हॅक करणं ही सर्वांत लोकप्रिय पद्धत आहे. यासाठी हॅकर्स एक तर स्वत: तुमच्या फोनमध्ये असे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतात किंवा कोणताही फिशिंग मेल वापरतात. यासाठी हॅकर्स दोन प्रकारची सॉफ्टवेअर्स वापरतात. एक अतिशय लोकप्रिय ट्रोजन आहे.
लॉगिंग
दुसरी पद्धत की लॉगिंगची आहे. की लॉगिंग स्टॉकरप्रमाणे काम करतं. तुमच्या फोनमध्ये असलेल्या अशा सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही काय टाइप करत आहात, फोन स्क्रीनवर तुम्ही कुठे टॅप करत आहात आणि फोनवर तुम्ही कोणाशी बोलत आहात हे हॅकर्सना कळतं.
advertisement
ट्रोजन सॉफ्टवेअर
ट्रोजन सॉफ्टवेअर फोनमधला महत्त्वाचा डेटा चोरण्याचं काम करतं. या मालवेअरच्या मदतीने हॅकर्स तुमच्या फोनमधून क्रेडिट कार्ड डिटेल्स व वैयक्तिक माहितीसह इतर गोष्टी चोरू शकतात.
फोन हॅक झाल्याचे संकेत
- फोन हॅक झाल्यावर बॅटरी लवकर डिस्चार्ज होते.
- स्मार्टफोन स्लो काम करतो आणि लवकर गरम होतो.
- फोनमधली अॅप्स अचानक बंद होतात, फोन आपोआप ऑफ किंवा ऑन होतो.
advertisement
- गरजेपेक्षा जास्त डेटा संपतो. यामध्ये तुम्हाला SMS सह इतर चार्जही दिसतील.
फसवणूक कशी केली जाते?
सर्वांत सोपी व लोकप्रिय पद्धत फिशिंग अटॅक आहे. यामध्ये हॅकर्स फिशिंग मेल, ऑफर किंवा SMS च्या माध्यमातून लोकांना फसवतात. हॅकर्स मेल किंवा मेसेजमध्ये अननोन लिंक पाठवतात. युझर्सनी त्यावर क्लिक करताच फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होतं.
दुसरी पद्धत ब्लूटूथ हॅकिंगची आहे. प्रोफेशनल हॅकर्स अशा डिव्हाइसचा वापर करतात जे वल्नरेबल डिव्हायसेसच्या शोधात असतात. तुमच्या फोनमध्ये ब्लूटूथ नेहमी ऑन राहत असेल तर हॅकर्स 30 फुटांवरून तुमचा फोन हॅक करू शकतात.
advertisement
सिम कार्ड स्वॅपिंग हीदेखील एक हॅकिंग पद्धत आहे. 2019मध्ये, ट्विटरच्या सीईओंचं सिम कार्ड स्वॅपिंगद्वारे हॅक झालं होतं. यासाठी, हॅकर्स तुमच्या वतीने तुमच्या सिम ऑपरेटरला कॉल करतात आणि सिम बदलण्याची मागणी करतात. हॅकरला नवीन सिम कार्ड मिळताच तुमचं मूळ सिम कार्ड काम करणं थांबवतं.
सुरक्षित कसं राहायचं?
- इंटरनेटच्या जगात तुम्हाला स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असेल, तर तुम्ही अॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे. फक्त एक सेटिंग करून तुम्ही सुरक्षित राहू शकत नाही. तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही आणि हॅकर्सच्या सापळ्यात न अडकण्यासाठी तुम्हाला सजग राहावं लागेल.
advertisement
- नेहमी तुमचा फोन व अॅप्स अपडेट करत राहा. त्यामुळे हॅकर्सना लूपहोल मिळणार नाही.
- ऑनलाइन लाइफस्टाइल सिक्युअर ठेवण्यासाठी चांगला आणि युनिक पासवर्ड वापरा.
- पब्लिक वायफाय व चार्जिंग स्टेशन वापरणं टाळा.
- अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. मेसेज ओळखीच्या व्यक्तीने पाठवला असेल तरी अशा लिंककडे दुर्लक्ष करा.
- गरज नसताना ब्लूटूथ व वायफाय बंद ठेवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 15, 2023 6:21 AM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
Phone Hack : फोनमध्ये दिसायला लागले हे संकेत, तर समजून जा... तुमचा फोन हॅक झालाय!









